नागोवा आगीमुळे गॅरेजचे नुकसान

Dainik Gomantak
मंगळवार, 19 मे 2020

नागवा- हडफडे पंचायत क्षेत्रात कळंगुट समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शिरोडकर यांची दुचाकी दुरुस्तीची गॅरेज या भागात आहे.

शिवोली

नागोवा-कळंगुट येथील मुख्य रस्त्याशेजारी असलेल्या प्रदीप शिरोडकर यांच्या गॅरेजला रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आकस्मिक लागलेल्या आगीत अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले. पिळर्ण अग्निशमन दलाकडून पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान ही आग विझवण्यात आली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
नागवा- हडफडे पंचायत क्षेत्रात कळंगुट समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शिरोडकर यांची दुचाकी दुरुस्तीची गॅरेज या भागात आहे. रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीची माहिती कोणीतरी अज्ञाताने फोनवरून अग्निशमन दलाला देताच तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या दलाच्या जवानांनी सुमारे पाऊणतासाच्या मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
शिरोडकर यांच्या गॅरेजला लागूनच अजय पाल तसेच नवाज पाल यचे जुन्या फर्निचरचे दुकान आहे. रविवारी लागलेल्या आगीत शिरोडकर यांच्या एकूण सात दुचाक्यासह पाल यांच्या मालकीचे किंमती लाकडी फर्निचरही या आगीत जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली.

संबंधित बातम्या