Mapusa : गाडी पालिकेची; कचरा मात्र भंगारअड्ड्याचा? म्हापशात चाललंय तरी काय?

उपनगराध्यक्षांनी इतर दोन नगरसेवकांसोबत बेकायदेशीरपणे वाहतूक करणार्‍या ट्रकचालकास रंगेहाथ पकडलं
Mapusa Garbage Collection
Mapusa Garbage CollectionDainik Gomantak

म्हापसा येथील नगरपालिकेचा कचरावाहू ट्रक बेकायदेशीरपणे घेऊन तो कोलवाळ पंचायत क्षेत्रातील एका भंगार अड्ड्यामध्ये कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या वाहन चालकास म्हापसा पालिकेच्या तीन नगरसेवकांनी रंगेहाथ पकडले.

भंगारअड्ड्यामधील कचरा उकल करुन तो म्हापसा पालिकेच्या आसगाव पठरावरील कचरा प्रकल्पात बेकायदेशीरपणे टाकण्याचा प्रयत्नात असलेल्या तात्पुरता चालकास उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, नगरसेवक विराज फडके, साईनाथ राऊळ यांनी रंगेहाथ पकडले. हा गैरप्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे, असा दावा या नगरसेवकांनी केला. या एका ट्रीपसाठी चालकास अडीज हजार रुपये मोबदला मिळतो, असे चौकशीवेळी समोर आले.

नगरपालिकेचे काही कर्मचारी कथितरित्या पालिकेचा कचरावाहू ट्रक बेकायदेशीरपणे भंगारअड्ड्यामधील कचरा गोळा करण्यासाठी वापरताहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार, आम्ही संबंधितांच्या मार्गावर होतो. यामध्ये इतर काही कर्मचारी गुंतलेले असावेत, असा आमचा संशय आहे, असं उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर म्हणाले आहेत.

मंगळवारी रात्री म्हापसा पालिका क्षेत्राच्या मार्गावरील कचरावाहू ट्रक (GA 03 K 2200) घेऊन पालिकेचा तात्पुरता कर्मचारी संशयित दुर्गाप्पा तलवार हा मुशीरवाडा-कोलवाळ येथील ए.के. इंटरप्राईस या भंगारअड्ड्यामधील कचरा नेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाला होता. त्यानुसार या वाहन चालकास नगरसेवकांनी कचरावाहू ट्रकसह रंगेहाथ पकडले. या घटनेची माहिती पालिका मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांना देण्यात आली. रात्री 8.30 च्या सुमारास सदर प्रकार घडला.

Mapusa Garbage Collection
Goa Taxi App : टॅक्सी अ‍ॅपबाबत वाहतूक मंत्र्यांचा मोठा खुलासा; पेडणेवासीयांसाठीही बंपर धमाका

ज्यावेळी आमच्या प्रभागात कचरावाहू ट्रक मागतो, त्यावेळी ट्रक उपलब्ध नसतात. मात्र अशाप्रकारे चालक गैरप्रकारात गुंतलेले दिसताहेत. या एका बेकायदा ट्रीपसाठी चालकास अडीज हजार रुपये मिळतात. या ट्रकचालकास विचारले तर तो पहिल्यांदाच आल्याचे सांगतोय. याप्रकरणाची मुख्याधिकार्‍यांकडे तक्रार केल्याचे नगरसेवक साईनाथ राऊळ यांनी स्पष्ट केलं आहे.

काही कामगार पालिकेचा कचरावाहू ट्रक बेकायदेशीरपणे इतरत्र ठिकाणाहून कचरा गोळा करुन तो म्हापसा पालिकेच्या कचरा प्रकल्पात आणून टाकताहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही संबंधितांच्या मार्गावर होतो व मंगळवारी सायंकाळी पालिकेच्या नगरसेवकांनी एका तात्पुरताचालकास कचरावाहू ट्रकसह रंगेहाथ पकडले. या चालकावर कारवाई करुन याप्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाऊ, असा इशारा मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com