Garbage Collector Assaulte: गोव्यात हरमल येथे कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण

Garbage Collector Assaulte: कचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर कुडव यांनी या मारहाणीच्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.
Garbage Collector
Garbage CollectorDainik Gomantak

Garbage Collector Assaulte: हरमल येथील पंचायत क्षेत्रातील कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पंचायत व कचरा व्यवस्थापन समितीने विल्सन डिसोझा नामक युवकाविरुद्ध येथील पोलिस आउट पोस्टमध्ये तक्रार नोंदवली आहे.

कचरा गोळा करणारे वाहन गिरकरवाडा भागातील कचरा गोळा करून परतत असताना विल्सन डिसोझा याने आपल्या भागातील कचरा केव्हा उचलणार अशी विचारणा केली. त्यावेळी आपण अर्ध्या तासात पुन्हा येतो व कचऱ्याची उचल करतो, असे डिसोझा यास सांगितले.

मात्र, आपल्या म्हणण्याकडे लक्ष न देता त्याने माझ्या कानशिलात लगावली व धकाबुक्की केली. त्यावेळी तिथल्या महिलांनी डिसोझा यास ओढून बाहेर नेले अन्यथा आपणास जबर मारहाण झाली असती, असे या कर्मचाऱ्याने तक्रारीत म्हटले आहे.

Garbage Collector
Goa: गोव्यातील ग्रामीण भागामध्ये खेळाडूंसाठी चांगल्या प्रकारच्या क्रीडा सुविधा करणार उपलब्ध- दिव्या राणे

दरम्यान, सरपंच भिकाजी नाईक यांनी गावाच्या स्वच्छतेकडे कसलीही तडजोड केली जाणार नाही. पर्यटन स्थळ असल्याने गावाची स्वछता हे प्राधान्य असून नागरिकांनी शुल्क भरून तसेच वाहनास उशीर झाल्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. कचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर कुडव यांनी या मारहाणीच्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com