सांगे पालिका क्षेत्रात कचरा समस्या गंभीर

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

सांगे नगरपालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन ओला आणी सुखा कचरा गोळा करणारे बापूर एन्व्हायरर्मेंट या कंत्राटदाराच्या कचरा गोळा करणाऱ्या कामगारांनी येत्या एक ऑक्टोबर पासून कचरा गोळा करण्याचे काम बंद करणार असल्याचे जाहीर केले असून नगरसेवक संजय रायकर यांनी त्यांना भेटून सविस्तर माहिती घेतली असता कचरा पेट्या खालून फुटल्या आहेत.

सांगे: सांगे नगरपालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन ओला आणी सुखा कचरा गोळा करणारे बापूर एन्व्हायरर्मेंट या कंत्राटदाराच्या कचरा गोळा करणाऱ्या कामगारांनी येत्या एक ऑक्टोबर पासून कचरा गोळा करण्याचे काम बंद करणार असल्याचे जाहीर केले असून नगरसेवक संजय रायकर यांनी त्यांना भेटून सविस्तर माहिती घेतली असता कचरा पेट्या खालून फुटल्या आहेत. त्यामुळे सर्व घाण रस्त्यावर सांडत असल्यामुळे नागरिक त्यांना फैलावर घेत असल्याचे सांगण्यात आले. दुसरी गोष्ट म्हणजे कचरा पेट्याना हॅण्डल नाही, ओढून न्हेण्यासाठी व्हील नाही, झाकण नाही अश्या समस्या असल्याचे कामगारांनी संजय रायकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर रायकर यांनी आपला पाठिम्बा व्यक्त केला. 

या संधर्भात नगरसेवक संजय रायकर यांनी १५ सप्टेंबर रोजी सांगे पालिकेच्या बैठकीत हा विषय उपस्थित केला असता नागराध्यक्षांनी नवीन प्लास्टिक कचरा पेट्या घेण्यासाठी पालिकेत फंड नसल्याचे सांगितले. या पूर्वी या प्लास्टिक कचरा पेट्या जीसूडा कडून देण्यात आल्या होत्या. आता जी सूडा म्हणते कचरा पेट्या देणे बंद केले आहे. पालिका संचालकांना हा विषय कळविल्यास त्यांच्याकडे निधी नसल्याचे सांगण्यात येते. अशा परिस्थितीत  येत्या एक ऑक्टोबरपासून घरोन घर कचरा उचल करण्याचे काम बंद पडल्यास सांगेत मोठी समस्या निर्माण होणार आहे.  कचरा उचल करणाऱ्या कामगारांचे म्हणणे बरोबर असुन पालिकेने काही पर्याय न काढल्यास आपला पाठिम्बा या कामगारांना असणार असे जाहीर केले.  ही गंभीर समस्या निर्माण होऊ नये या साठी नगरसेवक संजय रायकर यांनी ठोस उपाय योजना करण्यासाठी पालिकेला लेखी स्वरूपात निवेदन देऊन गंभीर समस्यांचे वेळीच उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. 

या संधर्भात नगराध्यक्ष केरोज क्रूज यांना विचारले असता ते म्हणाले की पालिकेचे उत्पन्न थकले आहे. व्यापारी बांधवानी जी रक्कम पालिकेत भरायची आहे ती भरल्यास ट्रेड लायसन्सचे नूतनीकरण केल्यास पालिका फंडात निधी उपलब्ध होऊ शकेल. त्याच बरोबर जी सूडा आणी पालिका संचालकांना पत्र व्यवहार करून या समस्येवर उपाय योजना करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. 

संबंधित बातम्या