राजधानी पणजीत कचऱ्यांचे ढीग

तेजश्री कुंभार
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

ठिकठिकाणी स्वच्छतेचा डांगोरा पिटला जात असताना राजधानी पणजीची अवस्था मात्र स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय वाईट आहे. राजधानी पणजीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीगच ढीग साचलेले दिसून येत आहेत.

पणजी

ठिकठिकाणी स्वच्छतेचा डांगोरा पिटला जात असताना राजधानी पणजीची अवस्था मात्र स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय वाईट आहे. राजधानी पणजीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीगच ढीग साचलेले दिसून येत आहेत. काही ठिकाणच्या कचऱ्याचे ढीग कुजल्याने येथून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे रोगराईची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरातील कचरा नियमित
एका बाजूला डेंगू आणि मलेरियासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ओला कचरा आजूबाजूला न ठेवण्याच्या सूचना दिल्या जात असताना दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेकडून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होताना दिसून येत नाही. यामुळे आता पणजीला स्मार्ट सिटी कसे म्हणायचे हा प्रश्न निर्माण होतो आहे.
राजधानी पणजीत १८ जून रस्त्यावर ठिकठिकाणी साचलेला कचरा ही एक समस्या होऊन बसली आहे. झाडांच्या बुंध्यावर, लाईटच्या खांबाजवळ तसेच ठिकठिकाणी अनेक दिवसांपासून ठेवलेला पालापाचोळा आणि बंद पिशवीत असणारा कचरा गेले कित्येक दिवस भरण्यातच आला नसल्याची माहिती येथील लोकांशी बोलल्यानंतर मिळाली. अनेकजण सकाळी कचरा नेला जातो, म्हणून रात्री कचरा बाहेर ठेवतात. मात्र हा कचरा ठरावीक वेळी खूप कमी वेळा नेला जातो. जेव्हा नेला जात नाही, तेव्हा त्यापासून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. नारळाच्या झावळ्या, झाडांच्या फांद्या, पालापाचोळा रस्त्यावर ठिकठिकाणी ढीग लावून ठेवलेले पहायला मिळतात. सध्या पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ढिगातील कचरा कुजलेला दिसत असून येथे मच्छर आणि माशांचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येते.

हा मार्ग निघू शकतो
अनेकवेळा दोन दोन दिवस कचरा उचलणारे कामगार येतच नसल्याच्या तक्रारी ऐकायला येत आहेत. अशावेळी कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक सोसायटीत ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी महानगरपालिकेने मोठे स्वतंत्र डबे ठेवून पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा हा कचरा नेण्यासाठीची व्यवस्था करायला हवी. शिवाय डासांची उत्पत्ती कचऱ्यामुळे होऊ नये म्हणून ठिकठिकाणी कुजत पडलेला पालापाचोळा लवकरात लवकर उचलणे गरजेचे आहे.

कुत्र्यांकडूनही होतोय त्रास
दरम्यान कोविडच्या प्रसारामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून घरातून ओला आणि सुका गोळा करणारे कर्मचारी कचरा न्यायला येत नाहीत. सोसायटीच्या खाली ठेवलेलाच कचरा उचलून नेला जात असल्याचे पहायला मिळते. यामुळे ज्यांचा कचरा योग्य वेळेत न ठेवल्याने उचलला जात नाही किंवा एखाद्या वेळेस कचरा गोळा करणारे कर्मचारी येत नाहीत तेव्हा हा कचरा कुत्र्यांकडून इकडेतिकडे पसरवलेला पहायला मिळतो. शिवाय ज्या ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहे तेथे कुत्र्यांचे कळप असलेले पहायला मिळतात.

Editing _ Sanjay Ghugretkar

संबंधित बातम्या