गोव्यात आझोशी कोमुनिदादच्या जागेत कचरा!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

आझोशी कोमुनिदादच्या कदंब पठारावरील जागेत बेकायदेशीरपणे कचरा आणून टाकला जात आहे. त्याशिवाय खड्डे खोदून तो बुजविण्याच्या घटना  होत असल्याचे आता उघड झाले आहे.

पणजी: आझोशी कोमुनिदादच्या कदंब पठारावरील जागेत बेकायदेशीरपणे कचरा आणून टाकला जात आहे. त्याशिवाय खड्डे खोदून तो बुजविण्याच्या घटना  होत असल्याचे आता उघड झाले आहे. या प्रकाराची सरकारी पातळीवर दखल घेऊन संबंधितांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  

कदंबा पठारावरीलसर्व्हे नं. ६/०, ७/० आणि ६४/० या कोमुनिदादच्या जमिनीवर कचरा आणून टाकण्यात आला आहे. पिलार ते नेवरा या रस्त्याचा वापर कचरा आणून टाकण्यासाठी होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कचऱ्याने खड्डे भरण्यात आले असून, काही ठिकाणी हॉटेलचा कचराही टाकण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. रामराव वाघ, महेंद्र शिरोडकर, विद्याधर नाईक, श्‍याम पर्वतकर, परशुराम नाईक आणि दीपक नाईक यांच्यासह इतर ग्रामस्थांनी या ठिकाणची पाहणी केली.

 याठिकाणी खड्ड्यात मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकल्याने दुर्गंधी सरली आहे. आझोशी-मंडुरच्या सरपंचांशी वाघ यांनी संपर्क साधला परंतु त्यांनी ही जागा कोमुनिदादच्या हद्दीत येत असल्याचे सांगितले. या प्रकाराची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घ्यावी, तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली. मागील काही वर्षांपूर्वी याठिकाणी शहरातील एका विकासकाने येथे बांधकामाचा कचरा आणून टाकला होता, त्याला ग्रामस्थांनी विरोध केला होता.
 

संबंधित बातम्या