Goa Fire: सोनसोडोच्या शेडमधील कचऱ्याला लागली आग

भीतीचे वातावरण : आगीवर नियंत्रणासाठी केला 21,000 लिटर पाण्याचा वापर
Garbage Fire
Garbage FireDainik Gomantak

सोनसोडो कचरा यार्डवर कचऱ्याने भरलेल्या शेडला आग लागल्यानंतर शेडमधून धूर निघू लागल्याने सोनसोडो कचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा चर्चेत आला. मडगाव अग्निशमन दलाकडून शेडमध्ये मिथेन वायू तयार झाल्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या यार्डवरील जागा जवळजवळ ओल्या कचऱ्याने भरलेली आहे. मंगळवारी सकाळी शेडमधून धूर निघू लागल्याने मडगाव अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग व धूर आटोक्यात आणला.

सकाळी 7 वा.च्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला साडेतीन तासांचा अवधी लागला. यासाठी सुमारे 21,000 लिटर पाणी व दोन बंब दोन-दोन वेळा वापरण्यात आले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तीन ते चार तास खर्ची घालावे लागले.

नगरपालिकेला शेडच्या आत एक जेसीबी मशीन तैनात करण्यास सांगितले होते. शेडमधील ओला कचरा कोरडा झाल्यामुळे आत मिथेन वायू तयार होण्याची शक्यता आहे.

मागील वेळी असला प्रकार घडला होता त्यावेळी आम्ही एमएमसीला कचरा ओला ठेवण्यास सांगितले होते. अग्निशमन दलाने आतील मिथेन वायू बाहेर काढण्यासाठी कचरा ओला करून आगीवर नियंत्रण मिळविले. - गिल सौझा, मडगाव अग्निशमन दलाचे अधिकारी

Garbage Fire
Anjuna Crime: हणजूण हल्लाप्रकरणातील पाचवा संशयित गजाआड

अग्निशमन दलाचे म्हणणे...

शहरात दररोज निर्माण होणारा ओला कचरा कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता शेडमध्ये टाकण्यात येत आहे. परिणामी कचरा आतच साचून राहत आहे आणि त्यामुळे मिथेन वायू निर्माण होतो. ज्यामुळे अधूनमधून आग आणि धूर निर्माण होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com