कांपाल मैदानावर पुन्हा कचरा, मातीचे ढीग!

dainik Gomantak
शनिवार, 30 मे 2020

कांपाल मैदानावर पुन्हा कचरा, मातीचे ढीग वाढू लागले आहेत. अगोदरच्या कचऱ्यातील वेगळे केलेले प्लास्टिक अद्याप मैदानावरून हटवलेले नसताना पालापाचोळा आणि मोडलेल्या घरांचे साहित्य आणून या मैदानावर डपिंग केले जात आहे. त्यामुळे गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाला पुन्हा येथील कचरा हटविण्याचा उपद्वव्याप करावा लागणार आहे.

पणजी

कांपाल मैदानाची महापालिकेने एक वर्षापूर्वी साफसफाई केली होती. महापालिकेने सर्व कचरा हटवला होता, पण त्यातून कित्येक टन प्लास्टिक वेगळे करण्यात आले. त्यामुळे जीएसआयडीसीने सध्या प्लास्टिकचे तुकडे करण्याची प्रक्रिया करण्याचे काम सीएमए कंपनीला दिले. गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम सुरू आहे, पण प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग काही कमी होईनासा झाला आहे. त्याच्या बाजूला म्हणजे मैदानाच्या उत्तरेला पुन्हा एकदा मातीचे ढीग वाढू लागले आहेत. त्याशिवाय शहरातील झाडाच्या फांद्या, पालापाचोळाही या ठिकाणी आणून टाकण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी सोनसोडोसारखी स्थिती होईल, अशी आजूबाजूच्या नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.
महापालिकेनेही शहरातील रस्त्याच्या बाजूच्या उचललेल्या गाड्या आणून मैदानावर ठेवल्या आहेत. त्या गाड्याही पावसाळ्यात व्यवस्थित रहाव्यात यासाठी महापालिकेसमोर प्रश्‍न आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जी माती टाकण्यात आली आहे, त्या मातीच्या ढिगाऱ्यावर ही वाहने ठेवली जातील. त्यामुळे पाण्यात वाहने राहणार नाहीत, यादृष्टीने टाकण्यात आलेल्या मातीचा वापर होणार आहे.

goa goa goa goa

संबंधित बातम्या