मडगावात रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे

‘सोनसोडो’चा रस्ता खराब झाल्याने समस्या
Garbage Problem in Madgaon
Garbage Problem in MadgaonDainik Gomantak

मडगाव : मडगाव परिसरात कचऱ्याची समस्या जटील बनली असून सोनसोडो कचरा यार्डवरील रस्ता पावसामुळे खराब झाल्याने कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकांना नियोजित ठिकाणी कचरा नेण्यात अडथळा येत आहे . त्यामुळे मडगाव शहरातील कचरा उचल करण्याच्या दैनंदिन कामावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात कचरा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणाची दखल घेऊन मडगाव पालिका मुख्याधिकारी रोहित कदम यांनी या सोनसोडो यार्डावर पाहणी करून तात्पुरता कच्चा रस्ता बांधण्यासाठी पावले उचलली आहेत.

सोनसोडो कचरा यार्डवर पालिकेच्या कचरावाहू ट्रकांना ये जा करण्यासाठी एकमेव रस्त्याचा वापर करावा लागत असून या रस्त्यालगतच कचरा टाकण्यात आला आहे. पावसाळयात हा कचरा तसेच माती , लोखंडी खिळे रस्त्यावर वाहून येत असतात, त्यामुळे वाहनांना कचरा नेण्यात अडचण येत आहे. कचरा असाच पडून राहिल्यास रोगराईची भीती रहिवाशांतून व्यक्त होत आहे.

Garbage Problem in Madgaon
Breaking : गोवा डेअरी निवडणुकीत राजेश फळदेसाईंचं पॅनल विजयी

कचरा उचल रखडली

काही ट्रकांना दिवसाच्या दोन फेऱ्या माराव्या लागत असून एकवेळचा ट्रक खाली करण्यास या ठिकाणी उशीर होत आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीतील कचरा उचल करायला मिळत नाही. त्यामुळे मडगावात कचऱ्याचे ढीग दोन दिवस पडून रहात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com