Garbage Tempo Collapsed in Pond: पिकेन-चिवार येथील तळीत कोसळला कचराटेम्पो

रस्त्यात अचानक जनावरे आली आडवी; ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून मारली उडी
Garbage Truck Fell into Lake
Garbage Truck Fell into LakeDainik Gomantak

Garbage Tempo Collapsed in Lake: हणजुणे-कायसूव ग्रामपंचायत क्षेत्रातील कचरा जमा करून नेत असताना ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने गुरुवारी सकाळी पिकेन-चिवार येथील तळीत टेम्पो कोसळला. प्रसंगावधान राखत टेम्पो ड्रायव्हरने तत्काळ बाहेर उडी घेतल्याने प्राणहानी टळली.

Garbage Truck Fell into Lake
Goa Government Initiative: स्टार्टअपना मिळणार 3.28 कोटी रुपये; गोवा सरकारकडून प्रोत्साहन

माजी सरपंच सावियो आल्मेडा यांच्या कार्यकाळात पंचक्रोशीतील कचरा गोळा करून तो साळगाव येथील कचरा प्रकल्पात टाकण्यासाठी सार्वजनिक निधीतून दोन टेम्पो खरेदी करण्यात आले होते, जे आजपर्यंत सेवा देत आहेत.

दरम्यान, दरदिवशी सकाळी सकाळी या भागातील शाळा-हायस्कूल्स सुरू होण्याच्या वेळेत असे कचरावाहू टेम्पो भरधाव वेगाने परिसरातून धावत असतात. त्यामुळे अशा अवजड वाहनांची वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक असून चालकाची एखादी छोटीशी चूक मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते, असे या घटनेवरून दिसून येत असल्याचे स्थानिकांनी ‘दै. गोमन्तक’ला सांगितले.

Garbage Truck Fell into Lake
JMFC On Vagator Nightclub Attack: वागातोर नाईट क्लबमधील हल्ल्याची डायरीतील नोंद सादर करा

कचरा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवरील चालकांचीही सकाळच्या फेरीवेळी पोलिसांकडून अल्कोहोल तपासणी होणे आवश्यक असून संपूर्ण राज्यात कचरा वाहतूक सेवेत सुसूत्रता आणणे गरजेचे असल्याची अनेकांची मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com