काणकोणात संतप्त नागरिकांनी कचरावाहू ट्रक रोखला

ट्रकमधून हमरस्त्यावर कचरा सांडत असल्याने नागरिकांचा संताप
Truck Seized in Canacona
Truck Seized in CanaconaDainik Gomantak

काणकोण : ट्रकमधून कचरा मडगाव- कारवार हमरस्त्यावर पडल्याने संतप्त नागरिकांनी ट्रक अडवला आहे. लोलये पंचायत क्षेत्रातील संतप्त नागरिकांनी ट्रक पोळे तपासणी नाक्यावर पोलिसांना अडवण्यास भाग पाडले. बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. (Truck Seized in Canacona News Updates)

Truck Seized in Canacona
मुरगाव येथे मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

गोव्याहून (Goa) कर्नाटकात कचरा वाहून नेताना ट्रकमधून कचरा मडगाव- कारवार हमरस्त्यावर पडला. KA22 C 7813 हा ट्रक कचरा वाहून नेत होता. 16 टन बेलींग केलेला कचरा या ट्रक मध्ये होता, मात्र कचरा भरताना तो ट्रकच्या बाहेर आल्याने वाहतूकीवेळी ट्रकवर आच्छादलेली ताडपत्री तुटली आणि कचरा रस्त्याच्या कडेला पडत गेला.

Truck Seized in Canacona
जानेवारी 2022 पर्यंत मोपा विमानतळाचे 60 टक्के काम पूर्ण

दरम्यान लोलये पंचायतीचे माजी पंच सांतान कॉस्ता यांनी ट्रक अडवून चालकाला तंबी दिली आणि कचऱ्याची (Garbage) उचल करण्यास सांगितले. मात्र त्याने कचरा उचलण्यास असमर्थता दर्शविल्याने पोळे तपासणी नाक्यावर तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपासणी नाक्यावर हा कचरावाहू ट्रक अडवून ठेवला आहे. पोलिसांनी (Police) वाहनाची कागदपत्रे जप्त केली असून ट्रक मालकाला रस्त्याकडील कचरा हटविण्याची सूचना केल्याची माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com