"...अन्यथा वास्को शहरातला कचरा मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर फेकू"

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

मुरगाव पालिकेच्या संपकरी कामगारांचा प्रश्न येत्या सोमवार पर्यंत सोडवा अन्यथा सोमवारपासून वास्को शहरात साचलेला कचरा नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या खाजगी निवासस्थानासमोर फेकू, असा इशारा आज काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी दिला.

पणजी: मुरगाव पालिकेच्या संपकरी कामगारांचा प्रश्न येत्या सोमवार पर्यंत सोडवा अन्यथा सोमवारपासून वास्को शहरात साचलेला कचरा नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या खाजगी निवासस्थानासमोर फेकू, असा इशारा आज काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी दिला. भाजपचे कार्यकर्ते राज्यभरात स्वच्छता अभियान राबवत आहेत मात्र वास्कोत साचलेला कचरा त्यांना का दिसत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

ते म्हणाले नगर विकास मंत्री मिलिंद नाईक वास्को शहरात राहतात त्यामुळे नगरपालिका कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. असे न करता ते अद्यापही संपकरी कामगारांना भेटलेले नाहीत. वित्त आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाना अधिकाधिक निधी उपलब्ध केला असता नाही कोविड काळात जादा काम केलेल्या कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन अद्याप दिले गेलेले नाही. त्यांनी पुकारलेल्या संपाची सरकारने दखल घेतलेली नाही. यामुळे वास्को शहरात कचरा साचून परिसर दुर्गंधीमुळे झालेला आहे. एका बाजूने सरकार पर्यटकांना या असे आवाहन करते आणि दुसरीकडे शहरांची अवस्था अशी बकाल करते हा विरोधाभास आहे. नगर विकास मंत्र्यांनी हा संप ताबडतोब सोडवावा, संप मागे घेण्यास कामगारांशी मध्यस्ती केली पाहिजे. येत्या सोमवारपर्यंत संप मागे घेतला नाही तर आम्हाला नगर विकास मंत्र्यांच्या घरासमोर कचरा फेकण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही.

गोवा कार्निवल: महोत्सवाची तयारी पूर्ण; सरकार 60 लाख 35 हजार करणार रुपये खर्च -

संबंधित बातम्या