बोगमाळोत कचरा यार्डसाठी सौरऊर्जेचा वापर

कचऱ्यापासून तयार होणारे सेंद्रीय खत स्थानिकांना मोफत वितरित करण्याची मॉविन गुदिन्होंची घोषणा
Gargabe Yard will be used for Solar Power plant Says Mauvin Godinho
Gargabe Yard will be used for Solar Power plant Says Mauvin Godinho Dainik Gomantak

वास्को : चिकोळणा बोगमाळो पंचायतीने कचरा व्यवस्थापन यार्डसाठी सौरउर्जेचा वापर सुरु केला आहे. असा वापर करणारी चिकोळणा बोगमाळो पंचायत गोव्यातील पहिली पंचायत ठरली असल्याचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. या यार्डमध्ये कचऱ्यापासून तयार होणारे सेंद्रीय खत स्थानिकांना मोफत वितरित करण्यात येणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.

सौरउर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री गुदिन्हो यांच्यासह सरपंच लॉरेन डिकुन्हा, उपसरपंच संकल्प महाले, पंच लक्ष्मण कवळेकर, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, गटविकास अधिकारी प्रसिध्द नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. गोव्यातील सर्व पंचायतीतील साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा यार्डांमध्ये सौर उर्जाचा वापर करण्यात येणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.

Gargabe Yard will be used for Solar Power plant Says Mauvin Godinho
‘ओडीपी’संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचे निर्देश

कचरा विल्हेवाट लावावी, असे प्रत्येकाला वाटते, परंतू कचरा प्रक्रिया प्रकल्प आपल्या घराच्या परिसरात असू नये असे काहीजणांना वाटते. त्यामुळे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारताना काही वेळा अडचणी उभ्या राहतात, असे गुदिन्हो यांनी सांगितले. कचरा प्रश्नी लवकरच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com