Goa: गॅस पाईपलाईनचे काम पाडले बंद

सांकवाळ औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या कल्व्हर्टचे नुकसान केल्याने बिर्ला झुआरीनगरमध्ये तणाव निर्माण झाला
 Goa: गॅस पाईपलाईनचे काम पाडले बंद
Sancoale काम थांबवण्याचे आदेश देताना सांकवाळ पंचायतीचे सरपंच गिरीश पिल्ले.सोबत पंचायत सचिव कृष्णा गौडे आणि स्थानिक पंच आरिश कादर.Dainik Gomantak

दाबोळी: इंडियन ऑइल-अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेड (IOAL) ने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने बिर्ला येथे गॅस पाइपलाइनचे काम करत असताना जोडणाऱ्या व्यस्त रस्त्यावरील महत्त्वाच्या झुआरी अॅग्रो फॅक्टरी आणि झुआरीनगर झोपडपट्ट्यांचा इतर रहिवासी परिसर, सांकवाळ (Sancoale) औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या कल्व्हर्टचे नुकसान केल्याने बिर्ला झुआरीनगरमध्ये तणाव निर्माण झाला.

Sancoale काम थांबवण्याचे आदेश देताना सांकवाळ पंचायतीचे सरपंच गिरीश पिल्ले.सोबत पंचायत सचिव कृष्णा गौडे आणि स्थानिक पंच आरिश कादर.
बाबू आजगावकरांमुळेच पेडण्याचा सुपरफास्ट विकास
Sancoale पंचायत अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गॅस पाईपलाईनचे काम बंद पाडले.
Sancoale पंचायत अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गॅस पाईपलाईनचे काम बंद पाडले. Dainik Gomantak

सांकवाळ पंचायत अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गॅस पाईपलाईनचे काम बंद पाडले. मिळालेल्या माहितीनुसार, बिर्ला झुआरीनगर येथील जसिया बेकरीजवळ गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना गॅस पाइपलाइन ठेकेदाराने शेकडो वाहनधारक आणि इतर व्यावसायिक वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यावर पीडब्ल्यूडीने बांधलेल्या कल्व्हर्टचा काही भाग कापला. महत्त्वाच्या आणि व्यस्त पुलाचे नुकसान झाले असल्याने संतप्त झालेल्या झुआरीनगर रहिवाशांनी तात्काळ सांकवाळ पंचायत अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि काही वेळातच सांकवाळ सरपंच गिरीश पिल्लई यांच्यासह पंचायत सचिव कृष्णा गौडे आणि स्थानिक पंच आरिश कादर यांनी घटनास्थळी धाव घेऊन काम थांबवले.

Sancoale काम थांबवण्याचे आदेश देताना सांकवाळ पंचायतीचे सरपंच गिरीश पिल्ले.सोबत पंचायत सचिव कृष्णा गौडे आणि स्थानिक पंच आरिश कादर.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या गट समितीची घोषणा

प्रकल्प कंत्राटदाराने मात्र तो रस्ता गुप्तपणे दुरुस्त करणार असल्याचा दावा केला. परंतु सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेल्या परवानग्यांवर समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. सांकवाळ पंचायतीने आता इंडियन ऑइल-अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंत्राटदाराला कल्व्हर्टची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी होईपर्यंत गॅस पाइपलाइनचे काम पूर्णपणे थांबवण्याचे निर्देश जारी केले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com