तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. परीक्षेतील तीन विषयांतील १८ यशवंतांच्या क्रमांकांत पंधरा स्थानांवर मुष्टीफंड आर्यन उच्च माध्यमिकचे चार विद्यार्थी आहेत. प्रथम आलेल्या गौरव अवस्थी याला गणित व रसायनशास्त्र या विषयांत प्रत्येकी ७२, तर भौतिकशास्त्रात ७० गुण मिळाले आहेत. मुष्टीफंडची शेख रुबिया अब्दुल सलाम ही विद्यार्थिनी भौतिकशास्त्र विषयात ६६ गुणांनी द्वितीय क्रमांकावर असून गणित विषयात तिला ६७ गुण मिळाले आहेत. मुष्टीफंडच्या सिद्धान्त उदय गोवेकर या विद्यार्थ्याने गणित - ७१, रसायनशास्त्र ६९, भौतिकशास्त्रात ६३ गुण मिळवून परीक्षेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुष्टीफंडच्याच कल्याण रघुवीर साळकर या विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र ५८, गणित ७१ गुण मिळवून यशवंतांत स्थान मिळवले आहे.