निबंध स्पर्धेत विद्यार्थी गटात गायत्री कदम प्रथम

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

शासकीय महाविद्यालय, खांडोळाची विद्यार्थिनी वैशाली रवी कदम, गणपत पार्सेकर महाविद्यालय, हरमलची तेजल तुळशीदास नाईक व  शांतादुर्गा उच्च माध्यमिक, डिचोलीची चतुरा चंद्रशेखर नार्वेकर याना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

पणजी: भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथीनिमित्त उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी  ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत विद्या प्रबोधिनी, पर्वरीची विद्यार्थिनी गायत्री बाळकृष्ण कदम हिने चार हजार रुपयांचे प्रथम बक्षीस पटकाविले. ३ हजार रुपयाचे द्वितीय बक्षीस सरकारी महाविद्यालय, खांडोळाचा विद्यार्थी गौरांग बाबुराव भांडीये याने तर २ हजार रुपयाचे तृतीय बक्षीस विद्या प्रबोधिनीचा राम देवू झोरे याने प्राप्त केले. शासकीय महाविद्यालय, खांडोळाची विद्यार्थिनी वैशाली रवी कदम, गणपत पार्सेकर महाविद्यालय, हरमलची तेजल तुळशीदास नाईक व  शांतादुर्गा उच्च माध्यमिक, डिचोलीची चतुरा चंद्रशेखर नार्वेकर याना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणपद्धती : फायदे व तोटे’ या विषयावर घेतलेल्या निबंध स्पर्धेत पीपल्स विद्यालय, कामुर्लीचे शिक्षक उदय रवींद्र सामंत यांनी ५ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस पटकावले. ४ हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस कामाक्षी एज्युकेशन सोसायटी विद्यालय, कुर्टी-फोंडाची शिक्षिका समिक्षा शिरोडकर हिला तर ३ हजार रुपयाचे तृतीय बक्षीस सरकारी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक महेश चंद्रकांत कशालकर यांना प्राप्त झाले.

प्रत्येकी दीड हजाराची उत्तेजनार्थ बक्षिसे अनुक्रमे हनुमंत मायणीकर (नवदुर्गा विद्यालय, पाळी-डिचोली), अरुण महाबळ (केशव स्मृती विद्यालय, दाबोली-वास्को) व विठोबा बगळी (कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, कोरगाव) या शिक्षकांना देण्यात आली. विजेत्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हेही प्रदान करण्यात आली.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या