गावडोंगरी पंचायत क्षेत्रात पाणी समस्या तीव्र, अनियमित पुरवठ्याचा परिणाम

Gaondongri panchyat in Canacona is suffering from severe water scarcity
Gaondongri panchyat in Canacona is suffering from severe water scarcity

काणकोण :  गावडोंगरी पंचायत क्षेत्रात गावणे ‘धरण उशाला व कोरड घशाला’ अशी परिस्थिती नोव्हेंबर महिन्यापासूनच निर्माण झाली आहे. सध्या गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील कर्वे वाड्यावर गावडोंगरी रस्त्याच्या कडेला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टॅंकरचे पाणी मिळवण्यासाठी या भागात रस्त्याच्या कडेला रहिवाशांनी ठिकठिकाणी पिंपे ठेवल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा खात्याकडून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

हीच परिस्थिती पालिका क्षेत्रातील राजबाग, तारीर, किंदळेबाग तसेच चावडी परिसरात आहे. पैंगीण पंचायत क्षेत्रातील वेलवाडा, चिपळे, गाळये भागातही अनियमित पाणीपुरवठा होत 
आहे. या संदर्भात काही रहिवासीयांनी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांची भेट घेऊन नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. त्यांनी जलपुरवठा खात्याचे स्थानिक कनिष्ठ अभियंता दीपराज  मडकईकर यांना कार्यालयात बोलावून यासबंधी विचारणा केली. चापोली धरणावर पाणी उपसा प्रकल्पातील पंपमध्ये बिघाड झाल्याने पाणी उपस्यावर मर्यादा पडल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com