कोरोनाच्या नियमांचा भंग करत पर्यटकांचा अमर्याद जल्लोष

कोरोनाच्या नियमांचा भंग करत पर्यटकांचा अमर्याद जल्लोष
Tourists rushes to the beaches in Goa for Christmas and new year celebration even during the corona pandemic

पणजी  :  रस्त्यावर पर्यटकांचा अमर्याद जल्लोष आणि चर्चमध्ये शारिरीक अंतर पाळत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत प्रार्थनासभा अशा वातावरणात नाताळ साजरा करण्यात आला. ख्रिस्ती धर्मियांमध्ये सणाच्या निमित्ताने उत्साह असला, तरी त्यांनी एकमेकांच्या घरी यानिमित्ताने मोठ्या संख्येने जात भेटी देणे टाळले. नाताळनिमित्तच्या मिठाईच्या पदार्थांचे वाटप मात्र करण्यात आले. व्हॉट्‍सॲप संदेशांद्वारे नाताळच्या शुभेच्छा देणेच अनेकांनी पसंत केले.

गेल्या चार दिवसांपासून देशी पर्यटक मोठ्या संख्येने राज्यात दाखल होत आहेत. नाताळनिमित्ताने त्यांच्या आनंदाला काल दुपारनंतर उधाण आले होते. त्यांनी किनारी भागात त्यांनी गर्दी केली होती. कोविडवरची लस सर्वांनी टोचून घेतली आहे आणि कसलाच धोका आता शिल्लक राहिलेला नाही, अशा बिनधास्तपणे या पर्यटकांनी शारिरीक अंतर आणि मुखावरणे वापरणे या नियमांचा भंग करणे सुरू ठेवले होते. सरकारी यंत्रणा मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना आवरण्यास असमर्थ ठरली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com