जेनेटो कार्दोझ, रितेश नागवेकर उत्तर गोव्यातून तडीपार

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेला सांताक्रुझ येथील जेनेटो कार्दोझ व कळंगुट येथील रितेश नागवेकर या दोघांना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर गोव्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे.
जेनेटो कार्दोझ, रितेश नागवेकर उत्तर गोव्यातून तडीपार

Goa Crime News

Dainik Gomantak

पणजी: गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेला सांताक्रुझ येथील जेनेटो कार्दोझ व कळंगुट येथील रितेश नागवेकर या दोघांना उत्तर गोवा (North Goa) जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर गोव्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. जेनेटो याने या आदेशाला स्थगिती देण्याची केलेली विनंती फेटाळण्यात आली. त्यामुळे दोघांनाही उत्तर गोवा क्षेत्रात राहता येणार नाही.

<div class="paragraphs"><p>Goa Crime News</p></div>
... तर मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन करणार: NSUI

दरम्यान, रिव्‍होल्‍युशनरी गोवन्सचे (Revolutionary Goans) प्रमुख मनोज परब (Manoj Parab) व सांतेश काणकोणकर या दोघांविरोधात पोलिसांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या तडीपारच्या अर्जांवरही सुनावणी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तडीपार न करता काही अटी घातल्या आहेत. परब यांना सहा महिन्यांसाठी दोन लाखांची वैयक्तिक हमी व एक सरकारी कर्मचारी असलेला हमीदार सादर करण्यास सांगितले आहे तर सांतेश काणकोणकर यांना सहा महिन्यांसाठी दोन लाखांची वैयक्तिक हमी देण्यास सांगितले आहे. सरकारतर्फे ॲड. सुषमा मांद्रेकर यांनी बाजू मांडली. पोलिस खात्यातर्फे या चौघांविराधात पोलिसांत दाखल असलेल्या तक्रारी तसेच त्यांच्या कारवाया समाजासाठी घातक असल्याने त्याना तडीपार करण्याची विनंती करण्‍यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com