गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह तिघांविरुद्ध पोलीसांत तक्रार दाखल

GFP files complaint against the three including the Goa chief minister
GFP files complaint against the three including the Goa chief minister

पणजी: गोमेकॉ(Gomeca) इस्पितळात काही कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठ्यातील हलगर्जीपणामुळे झाल्याने गोवा फॉरवर्ड पक्षाने(Goa Forward party) गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(CM Pramod Sawant), मुख्य सचिव परिमल राय(Chief Secretary Parimal Rai) व ऑक्सिजन व्यवस्थापन व वितरणच्या प्रमुख स्वेतिका सचन(Head of Oxygen Management and Distribution Swetika Sachan) (IAS) या तिघांविरुद्ध हलगर्जीपणा, कटकारस्थान(oxygen shortage deaths case) तसेच सदोष मनुष्यवध या आरोपाखाली काल आगशी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.(GFP files complaint against the three including the Goa chief minister) 

बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांना करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. या कोरोनाग्रस्त रुग्णांना सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा व साधनसुविधा पुरवण्याची या तिघांची जबाबदारी होती. या रुग्णांना कमी दाबाने ऑक्सिजन पुरवठा झाल्याने 72 जणांचा जीव गेला. मुख्यमंत्र्यांनी काल पीपीई किट घालून कोरोनाग्रस्त व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांची पाहणी केली तसेच चर्चा केली. ऑक्सिजन पुरवठा रुग्णांपर्यंत पोहचण्यास झालेल्या विलंबामुळे रुग्णांचा मृत्यू झाला असावा. मृत्यू ऑक्सिजनचा पुरवठा मध्यवर्ती पुरवठा येथून सुरळीत न झाल्याने व त्याच्या दाबामध्ये कमतरता झाल्याने या रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. रात्रीच्यावेळी प्राणवायचा पुरवठा एकाएकी थांबल्याने अनेक रुग्णांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला व त्यातच काहींचा मृत्यू झाला. साधनसुविधा युक्त असलेल्या राज्यातील गोमेकॉ इस्पितळात २६ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला त्याला सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

ऑक्सिजन पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी तसेच त्रुटी उघडकीस येऊनही मुख्यमंत्र्यांसह इतर दोघा आयआएस अधिकाऱ्यांनी कोणतीच ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न केला नाही. ऑक्सिजनचा पुरवठ्यात कोणताही खंड पडू न देता रुग्णांचा जीव वाचविण्याची त्यांची जबाबदारी होती. त्यांनी ही जबाबदारी पार पाडली नाही. ते आपल्या कार्यात अपयशी ठरले. इस्पितळात होत असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्याचे माहीत असून या तिघांनी तो वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच इतर दोघा आयएएस अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदारीत निष्काळजीपणा केला आहे.  माहीत असूनही प्रयत्न न केल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाना जीव गमवावा लागला. हे तिघेही आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले आहेत. हे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने या तिघांनाही जबाबदार धरून गुन्हा नोंदविण्याची विनंती पक्षाचे संयोजक जॉन नाझारेथ यांनी तक्रारीत केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com