Goa Politics: गिरीश चोडणकर स्थायी निमंत्रित सदस्य

काँग्रेस पक्षाकडून नियुक्ती : अमित पाटकर यांच्यासोबत पेलणार जबाबदारी
Girish Choankar
Girish ChoankarDainik Gomantak

माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची काँग्रेसने आपल्या समितीवर स्थायी निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. चोडणकर हे बहुजन समाजाचे नेते आहेत आणि त्यांच्‍या नियुक्तीने काँग्रेसला आगामी 2024 च्या लोकसभा आणि 2027 च्या विधानसभा निवडणुकीत किती फायदा होणार, हे निडणुकीनंतर स्पष्ट होईल.

Girish Choankar
Vishwajit Rane: सत्तरीकरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर; वाळपईत लवकरच क्रीडा संकुल बनणार

कार्यकारी समितीवर निवड झाल्याने एकप्रकारे चोडणकर यांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. पक्षाचा विस्तार करण्याची, त्याचबरोबर नवे नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारीही त्यांना अमित पाटकर यांना बरोबर घेऊन पेलावी लागणार, असे सध्या चित्र आहे.

चोडणकर प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, त्यात काँग्रेसला अपयश आले. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकारिणीत केंद्रीय समितीने बदल केले आणि राजकारणाचा फारसा अनुभव नसलेले युवा नेते अमित पाटकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिले.

Girish Choankar
Goa Police: गोवा सरकार व पोलिस ज्‍येष्‍ठांचे संरक्षण व तब्येतीची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर...

त्या दरम्यान, पक्षांतर्गत कुरघोडी उफाळून आली आणि चोडणकर गटाच्या पाचजणांवर पक्षाने निलंबनाची कारवाई केली. ती सोमवारी (आज) आता मागे घेण्यात आली. आता चोडणकर यांना एक पाऊल मागे घेत पाटकर यांच्याशी सूत जुळवावे लागणार आहे, तरच पक्षात एकसंघपणा येऊ शकतो.

दक्षिणेतून उमेदवारीसाठी प्रयत्नशील

भंडारी समाजाचे काँग्रेसमधील नेते म्हणून चोडणकरांची ओळख आहे. त्यामुळेच उत्तर गोव्यातील भंडारी समाजातील असंतुष्ट गट चोडणकर यांनी उत्तर गोव्यातून लोकसभेची निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्नशील आहे. तर स्वतः चोडणकर मात्र दक्षिण गोव्यातून पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत.त्यांनी दक्षिण गोव्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com