Goa: पेडणे मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आणूया : गिरीश चोडणकर

आगामी विधानसभा निवडणुकीत पेडणे मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आणूया. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने पक्ष कार्य करावे असे आवाहन गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले.
Goa: Girish Chodankar speaking at the meet
Goa: Girish Chodankar speaking at the meetDainik Gomantak

पेडणे: पेडणे मतदारसंघात (Pernem Constituency) काँग्रेस पक्ष (Congree)विविध समितींच्या माध्यमातून पक्षाची पुनर्बांधणी करुन अडीच ते तीन हजार सदस्य नोंदणी करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आणूया. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कार्य करावे असे आवाहन गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी शिरगळ धारगळ (Dhargal) येथे बोलताना केले. येथील काँग्रेस सेवादल कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शनावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उत्तर गोवा (North Goa) काँग्रेस सेवादल अध्यक्ष उल्हास वंसकर, काँग्रेस प्रवक्ते विठू मोरजकर, मदन शेटये, काँग्रेस कार्यकर्ते तथा गणपती मुर्तीकार सखाराम शेटये, काँग्रेस जेष्ठ कार्यकर्ते विजय गवस, नयन गावकर, उल्हास हरमलकर, कृष्णा गवस, राजू कोलवाळकर हे उपस्थित होते.

Goa: Girish Chodankar speaking at the meet
Goa: डिचोली शांतादुर्गा विद्यालयासाठी 3 कोटींचा इमारातीचा प्रकल्प

पुढे बोलताना श्री. चोडणकर म्हणाले की, पेडणे मतदारसंघात काँग्रेस समन्वय समितीच्या सहकार्याने काँग्रेस युवा समिती, (Congress youth comity) काँग्रेस महिला समिती, काँग्रेस सेवादल समिती व पेडणे तालुका काँग्रेस गटसमितीची निवड, महाविद्यालयीन समिती आदींची लवकरच निवड करण्यात येइल. असे ते म्हणाले. उत्तर गोवा (North Goa) काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वंसकर म्हणाले की, सध्या देशात व गोव्यात श्रीरामाच्या नावावर रावण राज्य आहे. या रावण राज्याला जनतेच्या सहकार्याने काँग्रेस पक्षच संपवून, राम राज्य आणू शकतो. पेडणेत भाजप व मगो पक्ष बेसुमार पैसा खर्च करत आहेत. हे पैसे घामाचे, कष्टाचे नाहीत. कुणी त्यांच्या पैशांना बळी पडून पश्चाताप ओढवून घेउ नये. यावेळी मदन शेटये यांनीही मेळाव्यात सूचना केल्या. मुर्तीकार तथा काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते सखाराम शेटये यांचा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देउन सत्कार करण्यात आला. सुरवातीस तारक वंसकर, मीनाक्षी शेटये, नयन गावकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले. श्रृती हरमलकर यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी मदन शेटये यांनी आभार मानले.

Goa: Girish Chodankar speaking at the meet
Goa: राजेंद्र आर्लेकर यांच्या उपस्थितीत वास्कोत कारगिल विजय दिवस साजरा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com