Goa flood: गिरीश चाेडणकर यांची वाळपईत पुरग्रस्त भागाची पाहणी

वाळपई शहरात सुमारे साठ घरे पूरग्रस्त झाली असून चाेडणकर यांनी त्या कुटुंबाची भेट देत चाैकशी केली.
Goa flood: गिरीश चाेडणकर यांची वाळपईत पुरग्रस्त भागाची पाहणी
Goa: Girish Chodankar while inspectin ValpaiDainik Gomantak

वाळपई: वाळपईत पुरामुळे (Valpai flood) झालेल्या स्थितीची गाेवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चाेडणकर (Girish chodankar) यांनी पाहणी केली. सत्तरी तालुक्यात सुमारे दिडशेहून अधिक कुटुंबे पूरात सापडली. वाळपई शहरात सुमारे साठ घरे पूरग्रस्त झाली असून चाेडणकर यांनी त्या कुटुंबाची भेट देत चाैकशी केली. यावेळी उपाध्यक्ष संकल्प आमाेणकर, सरचिटणीस जनार्दन भंडारी, युवा अध्यक्ष वरद म्हार्दाेळकर, वाळपई गट अध्यक्ष दशरथ मांद्रेकर, महिला अध्यक्ष राेशन देसाई व गाेवा प्रदेश युवा काँग्रेस (Youth Congress) पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Goa: Girish Chodankar while inspectin Valpai
Goa: डिचोलीत पुरामुळे 3 कोटींहून अधिक हानी

या भेटी दरम्यान चोडणकर यांनी सांगितले की, पूरग्रस्तांना तातडीने मदत (Help) करण्याची गरज आहे. सरकार तुटपुंजी मदत करुन नागरिकांची थट्टा करीत असतात पण यावेळी त्यांच्या झालेल्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी चाेडणकर यांनी केली. युवा अध्यक्ष वरद म्हार्दाेळकर यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health minister Vishwajeet Rane) यांच्या वर टिका केली. सरकारने गाेवा मुक्तीला ६० वर्षे झाल्या निमित्ताने आलेला ६० काेटी रुपयांचा निधी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वापरावा अशी मागणी केली. यावेळी पूरग्रस्तांना कडधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.

Goa: Girish Chodankar while inspectin Valpai
Goa Flood: पूरग्रस्तांना कॉंग्रेसने दिला मदतीचा हात

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com