दक्षिण गोव्यातील राजकीय नेत्याच्या मुलाकडून युवतीस मारहाण; काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मार्च 2021

दक्षिण गोव्यातील राजकीय क्षेत्रातील एका उच्च पदाधिकाऱ्याच्या मुलाने एका मुलीसंदर्भात आगळीक करून तिला मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

काणकोण: दक्षिण गोव्यातील राजकीय क्षेत्रातील एका उच्च पदाधिकाऱ्याच्या मुलाने एका मुलीसंदर्भात आगळीक करून तिला मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रतिक महेश नाईक याला रात्री ताब्यात घेतले व त्याला मध्यरात्री एक वाजता अटक केली. आज त्याला प्रथम सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. गोवा न्यायालयाने आरोपीला चौकशीसाठी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.(Girl beaten by son of South Goa political leader)

दरम्यान, तक्रार मागे न घेतल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी युवकाच्या वडिलांनी दिल्याचे पीडित युवतीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. हा प्रकार बुधवारी (ता.17) संध्याकाळी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी संशयित प्रतिक हा सदर युवतीच्या घरी गेला होता. घराबाहेर रस्त्यावर राहून त्याने जोरजोराने वाहनाचा हॉर्न वाजवून तिला त्याने तिला खाली बोलावले. ती खाली येताच त्याने तिला मारहाण केली.

Goa Budget 2021: गोव्यात अर्थसंकल्पावरून घमासान; विरोधक भेटले राज्यपालांना, मुख्यमंत्री आक्रमक 

यावेळी घरी युवतीचे आई-वडिल नव्हते. तिला मारहाण केल्यानंतर त्याने तिला जबरदस्तीने मोटार सायकलवर बसवून तो खोतीगावात गेला. त्याने आडवाटेवर मोटार सायकल थांबवून त्या ठिकाणीही आपल्याला मारहाण केल्याचे त्या युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधित पीडित युवती व तिच्या आई-वडिलांनी या संबंधी तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक धिरज देविदास यांनी दिली.(Girl beaten by son of South Goa political leader)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी व अन्य कार्यकर्त्यानी पोलिस स्थानकावर गर्दी केली. यावेळी संशयीत आरोपी प्रतिकला राजकीय दबावाखाली पोलिसांनी मोकळे सोडू नये, अशी मागणी कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी व गटाध्यक्ष प्रलय भगत यांनी केली. 

गोवा मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण; गोव्‍याची स्‍वयंपूर्णतेकडे वाटचाल! 

गोवा फॉरवर्डकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

काणकोण येथील एका मुलीचा झालेला विनयभंग व तिच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी काणकोण पोलिसांनी चौकशीत कोणतीही हयगय केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोवा फाॅरवर्डचे प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी दिला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला युवक हा भाजपच्या दक्षिण गोवा पदाधिकाऱ्याचा  मुलगा असल्याने या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली असून असे झाल्यास पोलिसांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तसेच त्या मुलीला संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

युवतीच्या डोक्याला जखम 

पीडित युवतीच्या डोक्याला जखम झाली असून डोक्याला सहा टाके पडले आहेत. त्या युवकाने आपल्या हातात असलेल्या कड्याने तिच्या डोक्यावर प्रहार केला. त्याचप्रमाणे तिच्या शरीरावर ओरबडल्याच्या खुणा आसल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या