फोंडा परिसरात डेंग्यूने घेतला युवतीचा बळी

पाच दिवसांपूर्वी आजोबांचे डेंग्यूमुळे निधन
फोंडा परिसरात डेंग्यूने घेतला युवतीचा बळी
Girl dies of dengue in pondaDainik Gomantak

फोंडा: येथील नागझर-कुर्टी येथील 17 वर्षीय युवतीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले ओह. सोमवारी दुपारी शोकाकूल वातावरणात या युवतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. डेंग्यूचा प्रभाव नागझर -कुर्टी भागात असल्याने सकाळी आरोग्य खात्याने या परिसरात डास निर्मूलनासाठी ‘फॉगिंग’ केले.

Girl dies of dengue in ponda
वास्को वासियांसाठी डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या ठरली डोकेदुखी

नागझर- कुर्टी येथील स्नेहा नाईक हिला ताप आला होता. रविवारी फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने तिला लगेच बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले.

Girl dies of dengue in ponda
Goa: डेंग्यू सदृश्य डास चावला तर जबाबदार कोण...

पाच दिवसांपूर्वी आजोबांचे निधन

30 सप्टेंबरला स्नेहाच्या आजोबांचेही वृद्धापकाळाने निधन झाले होते. सुरवातीला आजोबा आणि आता नातीच्या निधनामुळे नाईक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आई वडील तसेच दोन बहिणी असा स्नेहाचा परिवार होता. स्नेहा फर्मागुढी येथील महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होती.

Related Stories

No stories found.