'आर्थिक डबघाईला आलेल्या पालिकांना सरकारी अनुदान द्या'

शिष्टमंडळाने मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन परेरा (Lyndon Pereira) यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
'आर्थिक डबघाईला आलेल्या पालिकांना सरकारी अनुदान द्या'
Margao MunicipalityDainik Gomantak

मडगाव: पालिकांना मिळणारा ओकट्रॉय कर आता बंद झाल्याने आता गोव्यातील (Goa) पालिकांची आमदनी आटली असून त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना पगार देणेही मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या (Government of Maharashtra) धर्तीवर गोवा सरकारने (Government of Goa) पालिका व पंचायती यांना विशेष अनुदान सुरू करावे अशी मागणी अखिल गोवा पालिका कर्मचारी संघटनेने केली आहे. आज या संघटनेच्या एका शिष्टमंडळाने मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन परेरा (Lyndon Pereira) यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. नगरपालिका मंडळाने यासंबंधी खास बैठक बोलावून सरकारने असे अनुदान द्यावे या आशयाचा ठराव घेऊन तो सरकारला पाठवून द्यावा अशी मागणी केली.

गोव्यातील सर्व नगरपालिका मंडळांना आम्ही अशी विनंती केली आहे आहे अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस अनिल शिरोडकर यांनी दिली. ओकंट्रोय कमी झाल्यावर महाराष्ट्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना खास अनुदान देणारा कायदा पास केला आहे. तशीच व्यवस्था गोव्यातही व्हावी अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी राष्ट्रे सफाई कामगार आयुक्त एम. व्यंकटेशन यांनी गोव्याला भेट दिली असता त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली होती. पालिकांची आमदनी कमी झाल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. ओकंट्रोय कर कमी झाल्याने पगार देण्यात ओढाताण होते असे यावेळी पालिका मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com