Mopa Airport: सर्व पिवळ्या टॅक्सी व्यावसायिकांना स्टँड द्या

मागणीवर ठाम- पेडणेतील नागझर मैदानावर दुसऱ्याही दिवशी आंदोलन सुरूच
Goa Taxi
Goa Taxi Dainik Gomantak

Goa: मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर पेडणे तालुक्यातील काळ्या-पिवळ्या टॅक्सी असोसिएशनला वेगळा टॅक्सी स्टँड देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी रात्री दिले होते.

मात्र, सर्व पिवळ्या टॅक्सींना स्टँड द्यावा आणि याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळात मंजूर झाल्यानंतरच धरणे आंदोलन मागे घेतले जाईल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे नागझर मैदानावर मंगळवारी दुसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन सुरूच होते.

मुख्यमंत्र्यांनी सोमवारी आश्‍वासन दिले आहे. मात्र, किती टॅक्सींसाठी स्टँड असणार आहे, याची माहिती दिली नाही. शिवाय निर्णय मंत्रिमंडळात मंजूर होईपर्यंत, या आश्‍वासनाची खात्री देता येत नाही.

त्यामुळे पेडणे तालुक्यातील सर्व काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी विमातळावर स्टँड उभारावा, ही प्रमुख मागणी आंदोलकांंनी लावून धरली. मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी आज पुन्हा दिला.

विमानतळावरील ‘मेगा वाईड’ या कंपनीतील काही कामगारांना व्यवस्थापनाने हल्लीच काढून टाकल्याने कामगार संतप्त झाले आहेत. या कामगारांनी आंदोलनात सहभाग घेत सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी केली.

दोन वर्षांपासून ‘मेगा वाईड’ या कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत हे कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत होते. मात्र, आता कंत्राट नूतनीकरण न करता कामावरून कमी केल्याची कैफियत त्यांनी मांडली.

टॅक्सी व्यवसाय हा एकमेव व्यवसाय गोमंतकीयांच्या हातात आहे. तोच व्यवसाय आम्हाला करायचा आहे. आम्हाला सरकारी नोकऱ्या नको अथवा अनुदानही नको. केवळ विमानतळावर काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी स्टँड पाहिजे, हीच आमची मागणी आहे. सरकारने मागणी मान्य करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.- आंदोलक, टॅक्सी व्यावसायिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com