GMC Infant kidnapping case: त्या महिलेला जामीन देवू नका, बाळाच्या आईची मागणी

GMC Infant kidnapping case: त्या महिलेला जामीन देवू नका, बाळाच्या आईची मागणी
GMC Infant kidnapping case

पणजी: GMC Infant kidnapping case बांबोळी(Bambolim) येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय(Gomeco) इस्पितळ आवारातून एक महिन्याच्या बाळाच्या अपहरण प्रकरणी अटक केलेल्या संशयित विश्रांती मोहन गावस हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज बाल न्यायालयासमोर झाली. न्यायालयाने अर्जदाराच्या वकिलांची तसेच सरकारी वकिलांची बाजू ऐकून घेऊन या जामीन अर्जावरील सुनावणी आता दुपारी बारा वाजता ठेवली आहे.(GMC Infant kidnapping case Dont give bail to Vishranti Mohan Gavas)

संशयित विश्रांती गावस हिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती ती कोठडी काल संपल्याने आगशी पोलीस तिला पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी अर्ज करणार आहेत त्यामुळे हा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. बाळाची आई या घटनेने भेदरलेली असल्याने तसेच संशयित महिला जामिनावर सुटल्यावर पुन्हा हस्तक्षेप करण्याची शक्यता असल्याने तिला जामीन देऊ नये अशी बाजू सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडली.

अजदार विश्रांती गावस हिची जबानी नोंद करण्यात आली आहे. पोलिसानी आवश्यक असलेले पुरावे जमा केले आहेत. तिची तसेच बाळासह पालकांची डीएनए चाचणी सुद्धा झाली आहे. संशयित वाळपई येथील स्थानिक रहिवासी असल्याने ती पळून जाण्याची शक्यता नाही. पोलिसांनी तिची न्यायाधीशांसमोर कलम 164 खाली जबानी नोंद केली आहे त्यामुळे तिला जामीन द्यावा असा युक्तिवाद अर्जदाराचे वकील गॅलेलियो टेलिस यांनी आज न्यायालयासमोर केला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com