GMC Infant kidnapping case: संशयित महिलेला सशर्त जामीन मंजूर, बाळाचे पालक राहत असलेल्या परिसरात प्रवेश बंदी

GMC Infant kidnapping case: संशयित महिलेला सशर्त जामीन मंजूर, बाळाचे पालक राहत असलेल्या परिसरात प्रवेश बंदी
GMC Infant kidnapping case

पणजी: बाळ अपहरणप्रकरणातील संशयित विश्रांती मोहन गावडे तिला आज बाल न्यायालयाच्या न्यायाधीश विजया आमरे यांनी सशर्त जामीन मंजूर केला. तपास काम पूर्ण होईपर्यंत संशयिताने बाळाचे पालक राहत असलेल्या परिसरात प्रवेश न करण्याची अट घातली आहे. बाल न्यायालयाने सशर्त जामीन देताना संशयिताला दहा हजार रुपयाचा वैयक्तिक जाचमुचलका व तत्सम रकमेचा एक स्थानिक हमीदार सादर करावा.(GMC Infant kidnapping case Vishranti Mohan Gavade granted conditional bail)

संशयिताने न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाऊ नये. या प्रकरणातील साक्षीदार तसेच बाळाचे पालक यांना धमकावण्याचा किंवा आमिष दाखवण्याचा प्रयत्न करू नये. पोलीस ज्यावेळी चौकशीसाठी बोलावतील त्यावेळी उपस्थित रहावे. तिने राहत असलेला तिचा कायमस्वरूपी पत्ता तसेच संपर्क साधण्यासाठी  माहिती पोलिसांना द्यावी अशा अटी आदेशात घालण्यात आल्या आहेत.

संशयित विश्रांती गावस हिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती ती कोठडी काल संपल्याने आगशी पोलीस तिला पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी अर्ज करणार होते त्यामुळे हा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. बाळाची आई या घटनेने भेदरलेली असल्याने तसेच संशयित महिला जामिनावर सुटल्यावर पुन्हा हस्तक्षेप करण्याची शक्यता असल्याने तिला जामीन देऊ नये अशी बाजू सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडली होती. आणि बाळाच्या आईने जामीन देवू नये अशी मागणी केली होती. मात्र बाळ अपहरणप्रकरणातील संशयित विश्रांती मोहन गावडे तिला आज बाल न्यायालयाच्या न्यायाधीश विजया आमरे यांनी सशर्त जामीन मंजूर केला.

अजदार विश्रांती गावस हिची जबानी नोंद करण्यात आली आहे. पोलिसानी आवश्यक असलेले पुरावे जमा केले आहेत. तिची तसेच बाळासह पालकांची डीएनए चाचणी सुद्धा झाली आहे. संशयित वाळपई येथील स्थानिक रहिवासी असल्याने ती पळून जाण्याची शक्यता नाही. पोलिसांनी तिची न्यायाधीशांसमोर कलम 164 खाली जबानी नोंद केली आहे त्यामुळे तिला जामीन द्यावा असा युक्तिवाद अर्जदाराचे वकील गॅलेलियो टेलिस यांनी आज न्यायालयासमोर केला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com