Goa News : पासपोर्ट सक्तीचा !

‘जीएमआर’ने कर्मचाऱ्यांना दिला आदेश
airport news
airport news dainikgomantak

पणजी : प्रत्येक कर्मचाऱ्याकडे आपला पासपोर्ट असणे सक्तीचे आहे, असे जीएमआर विमानतळ कंपनीने खास बैठक घेऊन सांगितले. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांमध्ये पासपोर्टसाठी धावपळ सुरू झाली आहे. या कर्मचाऱ्यांना विमानळावरील काम करण्याची पद्धत आणि नियमावलीही समजावून सांगण्यात आली.

विमानतळावर नियुक्त अधिकतर कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीवर आहेत. त्यांनी सादर केलेल्या दस्तावेजांची पडताळणी झाली तरी प्रत्येक कर्मचारी हा स्वच्छ चारित्र्याचा आहे की नाही याची नव्याने पडताळणी करण्याचा आदेश आल्याने प्रत्येकाची पोलीस चौकशी होणार आहे. यासाठी ‘डिटेक्टीव्ह एजन्सी’ नेमली होती. कर्मचाऱ्यांनी आपला पासपोर्ट तयार ठेवावा, तुमची पोलीस पडताळणी केली जाणार आहे, असे जीएमआर कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. कर्मचाऱ्यांवर कोणताच गुन्हा नोंद नसावा, याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेशही दिला आहे.

ओळखपत्रे मिळतील

प्रत्येक कर्मचाऱ्याला नागरी विमानतळ महासंचालकांकडून प्रमाणपत्र व ओळखपत्र घ्यावी लागतात. सर्व कर्मचाऱ्यांची वर्गवारी असते. काहींचा अतिसंवेदनशील विभागांत समावेश असतो. काही कर्मचाऱ्यांकडे आता जी ओळखपत्रे आहेत ती कंपनीची आहेत. मात्र, त्यांना प्राधिकारणाकडून अधिकृत ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. हे कामही लवकरच सुरू होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

खास कर्मचारी नियुक्त : पासपोर्ट काढण्याबाबत काही अडचणी असतील तर अशा कर्मचाऱ्यांसाठी प्रशासकीय विभागात एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.हा कर्मचारी इतरांना याबाबत मार्गदर्शन करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com