गोव्यात दिवसभरात १०५ जणांना ‘कोरोना’

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

राज्यात  (सोमवारी) कोरोनाने तीन पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ७३४ इतकी झाली आहे.

पणजी: राज्यात  (सोमवारी) कोरोनाने तीन पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ७३४ इतकी झाली आहे. आज दिवसभरात १०५ लोकांना कोरोनाची लागण झाली तर ९१ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील रिकव्हरी रेट ९६.६७ टक्के इतका आहे. राज्यभरात ९५५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज ५८ लोकांनी होम आयसोलेशनचा मार्ग उपचारासाठी स्वीकारला तर इस्पितळात उपचार करण्यासाठी ३६ लोकांना भरती करून घेण्यात आले. ११७४ इतक्या कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या.
भारतात एकूण सक्रीय रुग्ण संख्येत घट होण्याचा कल कायम आहे. देशात आज २,७७,३०१ सक्रीय रुग्णांची नोंद झाली. 

संबंधित बातम्या