गोव्यात एकाच दिवसात 11 डॉक्टरांना कोरोनाची लागण  

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

कोरोना आता सर्वांनाच आपल्या विळख्यात घेऊ पाहत आहे. ''राज्यात कोरोना बंधितांवर उपचार करणाऱ्या  डॉक्टरांना संसर्ग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

पणजी : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणांसह राज्यसरकार युद्धपातळीवर उपाययोजना राबवत आहे.  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यसरकारने गेल्या आठवड्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन सुद्धा लागू केला होता. मात्र कोरोना आता सर्वांनाच आपल्या विळख्यात घेऊ पाहत आहे. ''राज्यात कोरोना बंधितांवर उपचार करणाऱ्या  डॉक्टरांना संसर्ग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सोमवारी (ता. 3) एका दिवसांत 11 डॉक्टरांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.  अशी माहिती  गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर (जीएआरडी) चे अध्यक्ष डॉ. प्रतीक सावंत यांनी दिली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या सुरवातीला देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून राज्यात 40 हून अधिक डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  त्यातील काही जण आधीच बरे झाले आहेत. तसेच त्यांच्या विलगीकरणाचा कालावधीही पूर्ण झाला आहे, तर काहीजण पुन्हा कर्तव्यावर दाखल झाले आहे. बहुतेकांना लसीकरण करण्यात आले आहे आणि त्यापैकी कोणालाही न्यूमोनिया किंवा इतर  गंभीर आजार नाहीत, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.  (In Goa, 11 doctors were infected with corona in a single day) 

कृषी खात्याच्या ढिगभर योजना, पण गोमंतकीयांना लाभ मिळेना!

याबाबत बोलताना डॉ. प्रतीक सावंत यांनी गोमंतकीयांना कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.  डॉक्टरांच्या विलगीकरणासाठी  शासनाने मिरामार रेसिडेन्सी उपलब्ध करून दिली आहे. बहुतांश डॉक्टरांमध्ये दोन दिवसात हळूहळू लक्षणे आढळून येतात. कोरोना बंधितांवर उपचार करताना डॉक्टर्स  12-12 तास पीपीई किटमध्ये वावरत आहेत.  मात्र तरीही त्यानं संसर्ग होत आहे. आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या मानसिक व शारिरीक आरोग्य बिघाडाच्या मार्गावर आहेत. डॉक्टरांना त्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे  राज्यातील समूह संसर्गाची साखळी तुटणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी जबाबदरीने वागण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर, जर नागरिकांनी कोरोना नियमांचे गांभीर्याने पालन केले नाही तर राज्यातील परिस्थिती अधिकच बिकट होऊ शकते, असा इशाराही डॉ. सावंत यांनी दिला आहे. 

गोव्यातील नामवंत लेखक तोमाझिन यांच्या चरित्र पुस्तकाचे प्रकाशन

याशिवाय,  जीएमसीच्या नवीन सुपरस्पेशलिटी रुग्णालयाला  किमान 50 डॉक्टरांची आवश्यकता आहे.  त्यासाठी इंटर्न्स डॉक्टरांनी आपली वैद्यकीय कौशल्य वाढविण्यासाठी आंच्यासोबत सामील व्हावे, असे डॉ. प[रातीक सावंत यांनी म्हटल आहे. आम्हाला अधिक मनुष्यबळ हवे आहे. आम्ही बेड तयार करीत आहोत आणि पीपीई घेत आहोत, पण डॉक्टर नसतील तर काय अर्थ आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान,  गेल्या आठवड्यात झालेल्या मृत्यूंपैकी जवळजवळ 20 टक्के मृत्यू 40  वर्षांखालील लोकांचे होते.  खरं तर, राज्यातील दोन कोविड -19  रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त प्रभागातील डॉक्टर 12  तासांच्या शिफ्टमध्ये जवळजवळ 100 कोरोनाबंधितांवर  उपचार करत आहेत.  त्यांना कोणताही त्रास होत नाही. तसेच,  दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजनची आवश्यकता असणारे गंभीर रूग्ण आहेत.  तर ज्याना हलकी लक्षणे हलक्या लक्षणे आहेत त्याना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या