गोवा: दिवसभरात 1410 नवे कोरोनाबाधित, 21 रुग्णांचा मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 22 एप्रिल 2021

गोवा सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज मोठ्या संख्येने नवे कोरोनाबाधित आढळून येत असून रग्णांच्या मृत्यूत अधिकच भर पडत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी गोवा सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तरीही लोकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आहे. (Goa 1410 new corona infections 21 patients die in a day)

गेल्या आठवड्याभरात राज्यात कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूचा आकडा वाढत असल्याने गोवा प्रशासनाच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. राज्यात रात्री 10 ते  सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

गोव्याला फिरायला जाताय जाणून घ्या नवीन नियम

गेल्या चोवीस तासात 1410 नवे कोरोना रुग्ण सापडले असून 21 नव्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 72,224 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 61 हजार 51 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या गोव्यात 10 हजार 228 रुग्ण ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 543 कोरोना रुग्णांवर राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. तर अन्य नागरिकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी गोवा सरकारने विविध ठिकाणी निर्बंध लादले आहेत.   
 

संबंधित बातम्या