गोवा: 'राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा'

गोवा: 'राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा'
Goa 15 days lockdown should be imposed in the state

राज्यात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे दररोज हजारोच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहे. राज्य सरकारने कोरोनाची सखळी तोडण्यासाठी पाच दिवसाांचा कडक लॉकडाऊन लावला आहे. मात्र तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढच होत आहे. यामुळे राज्य सरकारच्या त्याचबरोबर नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. यातच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि औषधांची कमतरता भासू लागली आहे. राज्य सरकारने राज्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन लावल्यानंतर राज्याबाहेरील मजूरांना राज्य सोडून न जाण्याचं आवाहन केलं होतं. (Goa 15 days lockdown should be imposed in the state)

मात्र या पाश्वभूमीवर आता राज्यातील कोरोनाची समस्या अधिक गंभीर होत असल्यामुळे सरकारने त्वरित 15 दिवसांचा लॉकडाऊन लावावा तसेच  गोव्या बाहेरुन येणाऱ्यांसाठी RTPCR चाचणी निगेटीव्ह प्रमाणपत्र अत्यावश्यक करावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत करण्यात आली असल्याची माहीत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digmbar Kamat) यांनी दिली आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com