गोवा: दिवसभरात 2321 नवे कोरोना बाधित, 38 जणांचा मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 एप्रिल 2021

आज दिवसभरात कोरोनामुळे 38 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव(Coronavirus) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे 38 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत तात्काळ बैठक बोलवण्यात आली आहे. महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka) या राज्यांप्रमाणे गोव्यात लॉकडाऊन (Goa Lockdown) करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी केली आहे.

गोव्यात तूर्त लॉकडाऊन नाही मात्र...

आत्तापर्यंत गोव्यात कोरोनामुळे 1055 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच गोव्यात आत्तापर्यंत 79 हजार 798 कोरोना केसेस सापडल्या असून आज दिवसभरात 2321 कोरोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 हजार 260 झाली आहे.

संबंधित बातम्या