Covid-19 Goa: राज्यात 24 तासांत 2693 रुग्ण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकले

Covid-19 Goa.jpg
Covid-19 Goa.jpg

पणजी: राज्यात (Goa) मागच्या चोवीस तासांत 1647 नवीन कोरोना रुग्ण (New Cases) आढळून आलेले असून आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 144839 (Confirmed Cases) वर पोहोचली आहे. तर यातील 18243 रुग्ण (Active Cases) सध्या गोव्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. (In Goa, 2693 patients have been cured in 24 hours.)

महत्वाची बाब म्हणजे राज्यात मागच्या चोवीस तासांत 39 रुग्णांचा मृत्यू (Deaths) झाला असून गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ही संख्या कमी झाली आहे. तर आता पर्यंत गाव्यात एकूण 2341रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात 24 तासांत 2693 (Recoverd) रुग्ण बरे झाले आहेत. 

गोव्यात कोरोना (Covid-19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चक्रीवादळामुळे झालेल्या परिणामांमुळे नागरिक विविध समस्यांना तोंड देता आहेत. त्यातच आता कोरोना आणि म्युकरमायकोसिस या नव्या आजाराने देखील तोंड वर काढले आहे. याच अनुशंघाने गोव्यातील रुग्णालयांत म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्याचा देखील निर्णय घेण्यात आलं आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com