गोवा: दिवसभरात 3 हजार 101 नवे कोरोनाबाधित

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 एप्रिल 2021

गोव्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला.

राज्यात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गोव्यात (Goa) आज पाच दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला. अनेक दिवसांचे विक्रम मोडीत काढत आज कोरोना बाधितांची संख्या 3101 झाल्याने कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे. सध्यातरी राज्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला असून प्रशासनाची ताराबंळ उडाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 85 हजार 9 एवढे कोरोना रुग्ण सापडले असून त्यापैकी 65 हजार 70 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (Goa 3 thousand 101 new corona affected in a day)

Goa Lockdown: पहा काय सुरु काय बंद

तर आज 3101 नवे कोरोना बाधित सापडले असल्यामुळे राज्य सरकारपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्य़ा 18,829 झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला असून राज्य प्रशासनाने आणखी 300 नव्या बेडची सोय केली आहे. याशिवाय नव्याने अत्याधुनिक कोविड सेंटर उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी आरोग्य प्रशासनासोबत नव्या सेंटरसाठी पाहणी सुरु केली आहे. नवे अत्याधुनिक कोविड सेंटर, गोवा मेडिकल कॉलेजच्या सुपर स्पेशालिस्ट विभागांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या