सात दिवसांत ३ हजार ३६२ ठणठणीत; राज्यात कोरोनाच्‍या दररोज सुमारे ३ हजार चाचण्‍या

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

मागील सात दिवसांत १२ हजार ३९६ जणांच्या चाचण्या घेण्यात आला. त्यापैकी ३ हजार ८३२ जण पॉझिटिव्ह आढळले. म्हणजे सरासरी २५ टक्के रुग्ण बाधित सापडू लागले आहेत, असे स्पष्ट होते.

पणजी: राज्यातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर नजर टाकली तर मागील सात दिवसांत (ता. १६ ते २२ सप्टेंबर) या कालावधीत ३ हजार ३६२ जणांच्‍या प्रकृतीत सुधारणा होऊन ते घरी गेले, तर ५३ जणांनी जगाचा निरोप घेतल्याचे दिसून येते.

राज्य आरोग्य सेवा संचालनालय कोरोनाविषयी दररोज आकडेवारीचे बुलेटिन प्रसिद्ध करते. त्यातून आता स्थिती गंभीर होत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मागील काही आठवड्यांपूर्वी दिवसाला ३ हजारांच्यावर चाचण्यांसाठी नमुने घेतले जात होते. परंतु अलिकडे अडीच हजारपेक्षा कमीच लोकांच्या चाचण्या केल्या आहेत. सध्या कमी चाचण्या घेऊनही पॉझिटिव्ह रुग्ण आढळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 

मागील सात दिवसांत १२ हजार ३९६ जणांच्या चाचण्या घेण्यात आला. त्यापैकी ३ हजार ८३२ जण पॉझिटिव्ह आढळले. म्हणजे सरासरी २५ टक्के रुग्ण बाधित सापडू लागले आहेत, असे स्पष्ट होते. मागील सात दिवसांत सर्वांत जास्त रुग्‍ण १९ रोजी २ हजार ११३ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. तर १७ रोजी सर्वाधिक ६४४ जण पॉझिटिव्ह आढळले. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची सात दिवसांतील २३९ (ता. २२) ही सर्वोच्च संख्या ठरली आहे. घरगुती विलगीकरण झालेले सर्वाधिक रुग्ण ता. १६ रोजी ५६३ नोंदले गेले आहेत. याशिवाय सात दिवसांत ५३ जणांचा मृत्यू झाला. ती आकडेवारी ४+८+८+७+९+९+८ अशी राहिली आहे.

जे रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते, त्यापैकी सात दिवसांत ३ हजार ३६२ जण प्रकृती सुधारल्याने घरी परतले आहेत. त्यात २२ तारखेला सर्वाधिक ७३६ जण घरी गेले आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या