गोवा: चोवीस तासात 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

आज दिवसभरात 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे सरकारी यंत्रणा ही हवालदिल झाली आहे.

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण तसेच मृत्यूचे प्रमाण अजूनही कमी होत नाही. आज दिवसभरात 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे सरकारी यंत्रणा ही हवालदिल झाली आहे. (Goa 36 corona patients die in 24 hours)

कोरोना रुग्णांना खाटांची कमतरता पडत असल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आता कोविल साठी वापरले जाणार आहे. यासाठी लागणारे सुमारे 20 हजार लिटर प्राणवायू आजच गोव्यात दाखल झाला आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात त्या सुपरस्पेशलिटी इस्पितळात होईल रुग्णांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

गोवा: जमावबंदी आदेशाचे मुख्यमंत्र्यांकडून उल्लंघन; जिल्हाधिकाऱ्यांची ‘...

आज मृत्यु झालेल्यांमध्ये २४ जण गोमेकॉ इस्पितळात, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात १० तर दोन उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात मृत्यू पावले आहेत. राज्यात प्रत्येक मिनिटाला दोन व त्यापेक्षा अधिक जणांना कोरोना संसर्गची लागण होत आहे. करणा चाचण्यांचे अहवाल उशिरा मिळत असल्याने अनेकजण घरात अलगीकरणात न राहता ते अहवाल येईपर्यंत बाहेर फिरतात त्यामुळे हा संसर्ग गेल्या काही दिवसांमध्ये राज्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढला आहे.

संबंधित बातम्या