गोवा: दिवसभरात नवे 3 हजार 19 कोरोनाबाधित 36 रुग्णांचा मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

आज दिवसभरात 900 रुग्ण बरे झाले असले तरी नव्याने 3 हजार 19 कोरोना बाधित मिळाले आहेत.

राज्यात कोरोना संसर्गाचा (Corona Second Wave) प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना सरकारने लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा निर्णय घेतला असून मात्र अद्याप कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आज तब्बल 3 हजार 19 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोव्यात (Goa) आत्तापर्यंत 88 हजार 28 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 65 हजार 984 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. (Goa 36 new coronavirus patients die in a day)

गोवा: चोवीस तासात 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू

आज दिवसभरात 900 रुग्ण बरे झाले असले तरी नव्याने 3 हजार 19 कोरोना बाधित मिळाले आहेत. यामुळे ऍक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या 20 हजार 898 झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णामध्ये 19 वर्षीय मुलीचा समावेश आहे तर 37 आणि 38 वर्षीय महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 24 पुरुष तर 12 महिला आहेत. 

दरम्यान, राज्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरुळीत असून 3 लाख 30 हजार 44 नागरिकांना लस देण्यात आली आहे. गोव्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला असून तो सोमवारपर्यंत राहणार आहे.
 

संबंधित बातम्या