Goa: भाजप सरकारला काँग्रेसमुक्तचा विसर

Goa: ‘आप’मध्ये प्रवेश केलेल्या महादेव नाईक यांचा आरोप
Goa: Accompanied in AAP by Mahadev Naik with Delhi's Power Minister Satyendra Jain,  Rahul Mhambare and Atishi.
Goa: Accompanied in AAP by Mahadev Naik with Delhi's Power Minister Satyendra Jain, Rahul Mhambare and Atishi.Dainik Gomantak

पणजी, ता. ६ (प्रतिनिधी)ः भाजपचे दोनवेळा आमदार (Two times MLA of BJP) व माजी उद्योगमंत्री (Former Industrial Minister) महादेव नाईक (Mahadev Naik) यांनी थेट दिल्ली गाठून दिल्लीचे मुख्यमंत्री (Chief Minister of Delhi) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात (Aam Admi Parti) प्रवेश केला. भाजपने काँग्रेसमुक्त सरकार बनविण्याचे वचन गोमंतकीयांना दिले होते. मात्र, काँग्रेसला भाजप प्रवेश देत आहे हा विनोद आहे. हे सरकार बेरोजगार गोमंतकीयांना नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन देऊन फसवणूक करत आले आहे. त्यामुळे गोव्याच्या जनतेने या दोन्ही पक्षाची सरकारे पाहिली आहेत त्यामुळे कंटाळलेली जनता ‘आप’ला यावेळी निवडणुकीत साथ देतील, असे मत नाईक यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केल्यावर व्यक्त केले.

पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील लोकांना ३०० युनिट मोफत वीज मोफत देण्याच्या वचनबद्धतेमुळे प्रभावित झालो. आप हा सध्या एकमेव लोककेंद्रीत पक्ष आहे. कोरोना महामारीवेळी आप रुग्णांना मदत करत असताना भाजप सरकार फक्त राजकारण करत होते. आपने घरोघरी जाऊन लोकांची प्राणवायूची तपासणी केली. अनेक ठिकाणी प्राणवायू तपासणी केंद्र स्थापन करून तसेच लोकांना घरी रेशन देऊन त्यांना दिलासा दिला. केजरीवाल मॉडेल गोमंतकीयांना मदत करणारे असल्याने आपण या पक्षात प्रवेश केल्याचे स्पष्टीकरण नाईक यांनी केले. गोमंतकीय सध्या राज्यातील राजकारणाच्या प्रकाराने कंटाळले आहेत. गोव्यात आप लोकांसाठी करत असलेले काम पाहिले आहे, म्हणूनच तळागाळातील लोक आणि महादेव नाईक यांच्यासारखे दोन वेळा आमदार झालेले आपमध्ये सामील झाले आहेत, असे ते म्हणाले.
सरकारने गोमंतकीयांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले आहे. मूलभूत गरज देण्यात सरकार आडकाठी आणत असल्याने आणि केजरीवाल मॉडेलमुळे त्यात फरक पडतो. त्यामुळेच महादेव नाईक आज आपमध्ये सामील झाले आहेत, असे आपचे राष्ट्रीय नेते सत्येंद्र जैन म्हणाले. आप हा गोव्यासाठी एकमेव पर्याय आहे. आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले. गोव्याने पाहिले आहे की कोरोनाच्या कठीण काळात कोणीही त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. गोमंतकीय थकले आहेत आणि त्यांना यापुढे भाजप किंवा काँग्रेस नको आहेत. भाजपने निर्माण केलेल्या कठीण काळात फक्त आप त्यांच्या पाठीशी आहे हे गोव्याला समजले आहे, असे म्हांबरे म्हणाले.

नाईक पक्षात असूनही नसल्यासारखेच ः कामत
शिरोडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून महादेव नाईक यांनी काँग्रेस प्रवेश केला होता. त्यांचा हा प्रवेश तसा फक्त निवडणुकीपुरताच होता. ते काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमात तसेच बैठकीला सहभागी झाले नव्हते. त्यामुळे ते पक्षामध्ये असून नसल्यासारखेच होते. त्यांच्या ‘आप’मधील प्रवेशाने काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com