Goa: दिल्लीच्‍या शैक्षणिक प्रगतीने महादेव नाईक भारावले

Goa: केजरीवाल यांच्‍या कार्याचे केले कौतुक; म्‍हणाले ‘आप’च भाऊसाहेबांची दूरदृष्टी गोव्यात पुन्हा आणू शकतो
Goa: Mahadev Naik inspecting a school in Delhi. Along with Aam Aadmi Party members.
Goa: Mahadev Naik inspecting a school in Delhi. Along with Aam Aadmi Party members.Aam Aadmi Party

पणजी : दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तेथील शिक्षण क्षेत्रात (In the field of education) जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा (Infrastructure) उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. या सुविधा पाहिल्‍यानंतर नुकतेच आम आदमी पक्षात प्रवेश केलेले महादेव नाईक आश्‍‍चर्यचकीत झाले व म्‍हणाले, ‘आप हा एकमेव असा पक्ष आहे की जो भाऊसाहेब बांदोडकरांची दूरदृष्टी (Vision) गोव्यात पुन्हा आणू शकतो’. ‘आप’ने दिलेल्‍या प्रसिद्धीपत्रकात म्‍हटले आहे की, मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) राहिलेले महादेव नाईक यांना काल शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी ‘आप’ने सिव्हिल लाईन्स-नवी दिल्ली येथे बांधलेल्‍या आरपीव्हीव्ही शाळेच्या दौऱ्यावर नेले होते. त्‍यावेळी तेथील सुविधा पाहून ते अचंबित झाले. गोव्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे काम आपल्‍या राज्‍यात का करू शकले नाहीत, याबद्दल त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले. नाईक म्हणाले की, आप हा एकमेव पक्ष आहे, जो गोव्यात (Goa) भाऊसाहेब बांदोडकरांची दूरदृष्टी पुन्हा आणू शकतो.

Goa: Mahadev Naik inspecting a school in Delhi. Along with Aam Aadmi Party members.
Goa:आग्वाद किल्ला ‘दृष्टी’च्या घशात


दिल्ली शासनाने चालवलेल्या शाळेने त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून दिले आहेत, ज्‍यामुळे शिक्षक दररोज विद्यार्थ्यांना शिकवतील. याउलट गोव्‍यातील सावंत सरकारचे काम आहे. हे सरकार गोव्यातील विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप किंवा कनेक्टिव्हिटी प्रदान करू शकले नाही. मुलांच्‍या माथ्यावर ऑनलाईन शिक्षणाचे ओझे लादले जात आहे. सावंत सरकारने गेल्या पाच वर्षांत भाऊसाहेबांनी उभारलेल्या ९२ प्राथमिक शाळा बंद केल्या. या शाळांच्‍या दुरुस्‍तीकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, असे नाइर्क म्‍हणाले.
यावेळी ‘आप’चे संयोजक राहुल म्हांबरे हेही उपस्‍थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com