‘म्हापशातील सीसीटीव्ही यंत्रणा दुरूस्त करा’

वार्ताहर
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

उत्तर गोव्याची प्रती राजधानी असलेल्या म्हापसा शहरातील सर्वांत मोठी बाजारपेठेत चोऱ्या व इतर गुन्हेगारी संदर्भात सुरक्षा यंत्रणा पाहिल्यास राम भरोसे आहे. 

म्हापसा: उत्तर गोव्याची प्रती राजधानी असलेल्या म्हापसा शहरातील सर्वांत मोठी बाजारपेठेत चोऱ्या व इतर गुन्हेगारी संदर्भात सुरक्षा यंत्रणा पाहिल्यास राम भरोसे आहे. 

 म्हापसा बाजारपेठेतील सात व बाजारपेठेबाहेरील पाच कॅमेरे काही महिन्यापासून नादुरुस्त आहेत. पण कोविड१९मुळे ग्राहक व नागरिकांची रेलचेल कमी असल्यामुळे मागच्या सहा महिन्यात चोऱ्या व गुन्हे बाजारात घडले नाहीत, म्हणून व्यापारी कळत न कळत सुरक्षित असल्याचे दृश्य पाहण्यास मिळते. 

सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करायला हवी, अशी नागरिकांप्रमाणेच व्यापाऱ्यांचीही मागणी आहे. म्हापसा नगरपालिकेने राजकीय दबावाखाली बाजारपेठेतील सर्व रस्ते फेरीवाल्याना देऊन टाकले आहे. त्यामुळे मिनी इंडियाचे रूप बाजाराला आले आहे. बाजारात मिनी इंडिया करून ठेवलेल्या फेरीवाल्यापुढे अनेक चोऱ्या व गुन्हे घडत होते, पण कोरोना महामारीतील टाळेबंदीनंतर बाजारात शांतता आहे. राजकीय पुढाऱ्यांनी अशा फेरीवाल्यांना आशिर्वाद देऊ  नये, अशी मागणी व्यापारी करीत आहे. 

  बाजारात प्रत्येक आठवड्याला पाकिटमारी, गुन्हेगारी, लोकांची दादागिरी असे अनेक प्रकार म्हापसा पोलिसात नोंद आहे. त्यामुळे म्हापसा पालिकेने पाच वर्षांपूर्वी युनियन फार्मसी, बाजाराच्या प्रवेशद्वारासमोर विरानीच्या दुकानावर आत्माराम डांगी यांच्या दुकानावर शंकुतला पुतळ्याच्या मागे जे.के. वाईन स्टॉअर, बाजारपेठ यार्डच्या गॅटस समोर असे बाजारात कॅमेरे बसविण्‍यात आले होते. 

 आंतरराज्य बसस्थानक, टॅक्सीस्थानक, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारतीजवळ गांधीचौक असे आणखीन कॅमेरे बसविले होते. त्यामुळे बाजार पेठेवर म्हापसा पोलिसांना नजर ठेवणे शक्य झाले होते.

संबंधित बातम्या