दाबोळी विमानतळावर चार महिन्यांत 2 कोटी 31 लाख रुपयांचे सोने जप्त

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 9 मे 2021

एअर अरेबिया 492 हे विमान आज सकाळी दाबोळी विमानतळावर आले असता अधिकाऱ्यांनी प्रवाशांची तपासणी केली. संशयित प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली आणि त्याच्याकडून बॅगेतील दहा सोन्याची बिस्किटे ताब्यात घेण्यात आली.

दाबोळी: गोवा कस्टम(Goa) विभागाने काल शनिवारी दाबोळी विमानतळावर(Airport) केलेल्या कारवाईत शारजाहून आलेल्या एका प्रवाशाकडून बॅगेत लपवून आणलेले 49 लाख 89 हजार रुपयांचे 1 किलो 175 ग्रॅम सोन्याची(Gold) दहा बिस्किटे ताब्यात घेतली. गोवा कस्टम आयुक्त मिहीर रंजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मूळ कर्नाटक(Karnatak) (भटकळ) येथील शारजाहून आलेल्या प्रवाशाने ही सोन्याची बिस्किटे(Golden biscuits) आपल्या बॅगेत लपवून आणल्या होत्या.(GOA 50 lakh gold seized at Daboli airport )

आमदार ढवळीकर ‘आत्मनिर्भर’ बनून प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात ‘स्वयंपूर्ण’ होण्याचा विचार करीत असावेत 

एअर अरेबिया 492 हे विमान आज सकाळी दाबोळी विमानतळावर आले असता कस्टम विभागाचे आयुक्त वाय. बी. सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कस्टम अधिकाऱ्यांनी प्रवाशांची तपासणी केली. संशयित प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली आणि त्याच्याकडून बॅगेतील दहा सोन्याची बिस्किटे ताब्यात घेण्यात आली. या बिस्किटांचे वजन 1 किलो 175 ग्रॅम इतके आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 49 लाख 89 हजार रुपये एवढी आहे. मागील चार महिन्यांच्या आत कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर केलेल्या कारवाईत 2 कोटी 31 लाख रुपयांचे सोने ताब्यात घेतल्याची माहिती कस्टम आयुक्त मिहीर रंजन यांनी दिली.

Goa Corona: राज्यात काल 3025 कोविडग्रस्त ठणठणीत बरे 

 

संबंधित बातम्या