Goa: आल्‍मेदांना डावलण्‍याचा प्रश्‍‍नच नाही

Goa: सदानंद शेट तानावडे : विकासकामांबाबत आमदार आहेत जागरूक
Goa: आल्‍मेदांना डावलण्‍याचा प्रश्‍‍नच नाही
Goa: Bjp team in vascoDainik Gomantak

वास्‍को : मतदारसंघातील विकासकामांबाबत आमदार कार्लुस आल्‍मेदा यांना डावलण्‍याचा प्रश्‍‍नच उद्‍भवत नाही. त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष केले जात असल्‍याच्‍या केवळ अफवा आहेत. उलट आल्‍मेदा हे विकासकामांबाबत नियमितपणे पाठपुरावा करतात व समस्‍याही मांडतात, असे भाजप प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. पक्ष संघटना मजबूत करण्‍याला आपले प्राधान्‍य आहे. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या नेतृत्‍वाखाली विकासकामे सुरू आहेत. येथील अग्‍निशमन दल केंद्र व कदंब बसस्‍थानक प्रकल्‍प अनेक वर्षे रखडला आहे. त्रुटी दूर करून लवकरच हे दोन्‍ही प्रकल्‍प कार्यान्‍वित केले जातील. अपूर्ण कामाबाबत कंत्राटदारासोबत संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढला जाईल. आमदार आल्‍मेदा हे आपल्‍या मतदारसंघातील प्रकल्‍पांबाबत व विकासकामांबाबत आपल्‍याकडे व मुख्‍यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करत आहेत. मुख्‍यमंत्र्यांबरोबर झालेल्‍या चर्चेत कदंब बसस्‍थानकाच्‍या रेंगाळलेल्‍या कामाबाबत तोडगा काढण्‍यात आला आहे. तसेच वास्‍को परिसरातील विकासकामे लवकरच पूर्ण केली जातील, असेही तानावडे म्‍हणाले.

आल्‍मेदा यांना विकासकामांबाबत संभाव्‍य अडथळे, समस्‍या चांगल्‍याच ज्ञात आहेत. कारण, ते भाजपचे सर्वसामान्‍य कार्यकर्ता ते आमदार बनले आहेत. कोविड महामारीच्‍या कालावधीत विकासकामांचा वेग मंदावला. मात्र, आगामी काळात विकासाभिमुख प्रकल्‍प रखडणार नाही, आल्‍मेदांच्‍या सहकार्याने त्‍यांचा पाठपुरावा केला जाईल, असेही तानावडे म्‍हणाले.

गणेश चतुर्थीनंतर मुख्‍यमंत्र्यांचा दौरा
कोविड महामारीच्‍या काळात विकासात्‍मक प्रकल्‍प रखडले. मात्र, गणेश चतुर्थीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे वास्‍को दौऱ्यावर येतील व कदंब बसस्‍थानकाच्‍या अर्धवट कामाची दखल घेतील. काही लोक निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर अफवा पसरवत आहेत. मात्र, भाजप त्‍यांची काळजी करत नाही. भाजपच्‍या संघटनात्‍मक व नियोजनबद्ध कार्यक्रमांद्वारे मतदारसंघाचा विकास केला जाईल, असे तानावडे म्‍हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com