गोव्यात कोरोनाचे ६४४ नवे रुग्ण; बळींची संख्‍या ३२७वर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज १ हजार ९२५ जणांच्या चाचण्या घेतल्या गेल्या. त्यात ६४४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३५६ जण घरगुती अलगीकरणात उपचार घेत आहेत, तर २०७ जण रुग्णालयात दाखल झाले आहेत.

पणजी: कोरोनामुळे राज्यात मागील २४ तासांत आज आठ जणांचा बळी गेला. त्यामुळे राज्यातील बळींची संख्या ३२७ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आज दिवसभरात ६४४ जण पॉझिटिव्ह सापडले असून ३९९ जण प्रकृती बरे झाल्याने घरी परतले.

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज १ हजार ९२५ जणांच्या चाचण्या घेतल्या गेल्या. त्यात ६४४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३५६ जण घरगुती अलगीकरणात उपचार घेत आहेत, तर २०७ जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. घरगुती अलगीकरणात उपचार घेणाऱ्यांची राज्यातील एकूण संख्या १० हजार ९२९ वर पोहोचली आहे. 

मागील २४ तासांत झालेल्या ८ जणांच्या मृत्युमुळे एकूण कोरोना बळींची संख्या ३२७ (बुधवारी ३१९) वर पोहोचली आहे. राज्यभरात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ६१२ एवढी झाली आहे.

मृतांमध्ये ताळगाव येथील ६५ वर्षीय महिला, सांगोल्डा येथील ८८ वर्षीय पुरुष, पर्वरी येथील ८५ वर्षीय महिला, काणका वेर्ला येथील  ४५ वर्षीय पुरुष, डिचोली येथील ८० वर्षीय पुरुष, करंजाळे येथील ५७ वर्षीय पुरुष, कुडतरी येथील ७७ वर्षीय पुरुष आणि कासांवली-सासष्टी येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

मोप विमानतळ क्षेत्रात काम करणाऱ्या बिगर गोमंतकीय कामगारांच्या आज झालेल्या कोरोना तपासणी अहवालात १०९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. विमानतळाचे काम करणाऱ्या या मजुरांत रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असून त्याचा संसर्ग सगळीकडे पसरण्याची शक्यता असल्याने लोकांत भीती व चिंतेचे वातावरण आहे. 

दरम्‍यान, वास्को शहर आरोग्य केंद्रात मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळू लागले आहेत. तोच प्रकार कुठ्ठाळी आणि कासावली आरोग्य केंद्रातील आहे. कंटेन्मेंट झोन हटविल्‍यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा प्रशासनावर ताण आला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या