Goa: डिचोलीत डेंग्‍यूचे ७ रुग्‍ण

Goa: पूरग्रस्त भागात उपाययोजनांना दिली गती
Goa: डिचोलीत डेंग्‍यूचे ७ रुग्‍ण
Goa: Fogging work in Saal.Dainik Gomantak

डिचोली : डिचोलीत डेंग्यूची साथ (Dengue In Bicholim, Goa) डोके वर काढत असून, गेल्‍या १५ दिवसांत विविध भागांत ७ रुग्ण आढळून आले आहेत. त्‍यात साळ भागात एक रुग्ण वगळता पूरग्रस्त भागात मात्र स्थिती नियंत्रणात आहे. त्‍यामुळे पूरग्रस्त भागा‍त उपाययोजनांना गती देण्‍यात आली आहे.

डेंग्यूचा फैलाव झाल्याने डिचोलीत भीती व्यक्त होत असली, तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य खात्याने केला आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. रुग्ण आढळून आलेल्या भागात फॉगिंग करण्यात आले आहे, अशी माहिती डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्‍या आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी दिली आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळले असली, तरी डिचोली बाहेरील अन्य भागांतून हा संसर्ग फैलावल्याचेही डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले आहे.

Goa: Fogging work in Saal.
Goa Politics: साखळी मतदार संघातून "आम आदमी पार्टी" चे मुख्यमंत्र्यांना आव्हान!

गेल्या महिन्यात पुराने तडाखा दिल्यानंतर पूरग्रस्त भागात निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे डेंग्यू आदी रोगराई पसरण्याची भीती आहे. आरोग्य खात्यातर्फे पूरग्रस्त भागात फॉगिंग तसेच जागृती करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत साळ भागात एक रुग्ण वगळता पूरग्रस्त अन्य भागांत रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती मिळाली आहे.

पावसाळ्‍यापूर्वी आढळले होते दोन रुग्‍ण

उपलब्ध माहितीनुसार, डिचोली शहरातील बोर्डे भागात २, सर्वण, वाठादेव, खरपाल, साळ आणि मुळगाव या भागात प्रत्येकी एक मिळून गेल्या पंधरा दिवसांत ७ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेल्या भागात फॉगिंग करण्यात आले असून, डेंग्यूचा फैलाव नियंत्रणात आहे, असे आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यापूर्वी डिचोलीत डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात होती.

Goa: Fogging work in Saal.
Goa: दाबोळीतील वाडे तळ्याची देखभाल करणे अत्यंत गरजेचे

Related Stories

No stories found.