Goa: मांगोरहिल भागातील 70 युवतींनी व 68 युवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

सर्वजण नव मतदार असून येत्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी ते आपला मतदानाचा पहिला हक्क बजाविणार आहेत.
Goa: मांगोरहिल भागातील 70 युवतींनी व 68 युवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश
सत्कार मूर्ती समवेत सदानंद शेट तानावडे, आमदार आल्मेदा,नगरसेवक यतिन कामूर्लेकर, दीपक नाईक, फ्रेड्रिक हेन्रिक्स, जयंत जाधव वगैरे उपस्थित होते.Dainik Gomantak

दाबोळी: भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व वास्कोचे आमदार कार्लस आल्मेदा यांच्या उपस्थितीत मांगोरहिल भागातील 70 युवतींनी व 68 युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे सर्वजण नव मतदार असून येत्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी ते आपला मतदानाचा पहिला हक्क बजाविणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात युवक-युवती विशेषतः युवती भाजपामध्ये सहभागी झाल्याबद्दल तानावडे यांनी भाजपा वास्को युवा मोर्चा अध्यक्ष अमेय चोपडेकर, सरचिटणीस सुदीप धारगळकर, नीलेश पाटील यांचे खास कौतुक केले. या युवक-युवतींच्या प्रवेशामुळे आमदार आल्मेदा यांची बाजू अधिकच बळकट झाली आहे.

सत्कार मूर्ती समवेत सदानंद शेट तानावडे, आमदार आल्मेदा,नगरसेवक यतिन कामूर्लेकर, दीपक नाईक, फ्रेड्रिक हेन्रिक्स, जयंत जाधव वगैरे उपस्थित होते.
Goa: शिरोडा येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अडथळा आणल्याने ७ ‘आरजीं’ना अटक

सदानंद शेट तानावडे यांनी वास्को मतदारसंघाचा सुमारे चौदा तासांचा दौरा केला. या मतदारसंघातील दौऱ्याचे नियोजन व दौऱ्याला मिळालेला प्रतिसाद पाहून ते भारावून गेले. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी भाजपाची ध्येयधोरणे त्यांच्यासमोर ठेवली. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपापासून दूर गेलेले तसेच पालिका निवडणुकीत दुसऱ्या ते चौथ्या क्रमांकांची मते घेणाऱ्या काही उमेदवारांना भाजपामध्ये परत आणण्यास आमदार आल्मेदा यांना यश आले. त्यांच्या या प्रयत्नांची तानावडे यांनी खास दखल घेतली.यावेळी आमदार आल्मेदा यांच्यासंबंधी उठणाऱ्या अफवांना तानावडे यांनी चोख उत्तर दिले.

सत्कार मूर्ती समवेत सदानंद शेट तानावडे, आमदार आल्मेदा,नगरसेवक यतिन कामूर्लेकर, दीपक नाईक, फ्रेड्रिक हेन्रिक्स, जयंत जाधव वगैरे उपस्थित होते.
Goa: 'मी येथे आघाडीची बोलणी करण्यासाठी आलेलोच नाही': चिदंबरम

मांगोर स्पोर्ट्स क्लबच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या भाजपावास्को युवा मोर्चाच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी 138 युवक युवतींनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना तानावडे यांनी आमदार आल्मेदा यांच्या जनसंपर्क व डावपेचाचे कौतुक केले. मांगोरहिल भागातील विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक फ्रेड्रिक हेन्रिक्स, नगरसेवक दीपक नाईक, यतीन कामुर्लेकर, नगरसेवक दिलीप बोरकर, नगरसेवक अमेय चोपडेकर, उपनगराध्यक्ष श्रध्दा महाले, करणाऱ्या युवक युवतींचाही सन्मान नगरसेविका देविता आरोलकर, गौरिष नाईक, सुदीप धारगळकर, नीलेश पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य जयंत जाधव उपस्थित होते. दरम्यान तौक्ते चक्रीवादळ काळात काही मच्छिमारयांना बुडताना वाचविणारया द्दष्टीच्या जीवरक्षकांची खास दखल घेऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com