Venzy Viegas: काँग्रेस आमदारांची शेवटची सेल नाताळपूर्वी संपणार

Amit Palekar: काँग्रेस नेत्यांचे भाजपमध्ये सामीलीकरण गोव्यासाठी अत्यंत अपवित्र
venzy viegas MLA of Aam Aadmi Party
venzy viegas MLA of Aam Aadmi PartyDainik Gomantak

काँग्रेसचे आठ आमदारांनी जनभावनेला सुरुंग लावत भाजपमध्ये प्रवेश केल्यावर आम आदमी पक्षाचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांनी "भाजप का दिल मांगे मोर" अशी टिप्पणी करत काँग्रेस आमदारांची शेवटची सेल नाताळपूर्वी संपणार असल्याचा दावा केला आहे.

(Goa AAP leader Captain Venzy Viegas criticizes Goa bjp)

काँग्रेसच्या या मेगा सेलनंतर आप ही गोवा आणि गोमंतकीयांसाठी एकमेव आशा आहे. हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. ही काँग्रेस जनता पार्टी यावेळीही गोमंतकीयांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरणार हे निश्चित आहे. त्यामुळे अशा संधिसाधू राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे व्हिएगस म्हणाले. पणजी येथील आयोजित पत्रकार परिषदेत व्हिएगस बोलत होते.

venzy viegas MLA of Aam Aadmi Party
Vijai Sardesai : विरोधकाची भूमिका समर्थपणे निभावण्यास मी तयार

आपचे अध्यक्ष अॅड. अमित पालेकर म्हणाले, “भाजपला “विरोधी पक्ष मुक्त” भारत हवा असल्याने विरोधकांना संपवण्यासाठी देशभर त्यांचे प्रयत्न चालू आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये 'आप'च्या नेत्यांना लाच देण्याचे प्रयत्न झाले, पण भाजपचा ऑपरेशन लोटस या ठिकाणी मात्र सपशेल अपयशी ठरला. देशात सध्या आप हा एकमेव पक्ष भाजपला जोरदार आव्हान देत आहे, त्यामुळे लोकांसमोर आप हा एकच पर्याय आहे.”

venzy viegas MLA of Aam Aadmi Party
MLA Digambar Kamat: देवाने सांगितल्यामुळे मी काँग्रेस सोडली

पालेकर म्हणाले, “काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील होणे ही गोव्यासाठी अत्यंत अपवित्र युती आहे. संपत्ती आणि सत्तेसाठी भाजपमध्ये सामील झालेल्या आठ आमदारांनी केवळ देवांचाच नव्हे तर गोमंतकीयांचाही विश्वासघात केला. आम्ही देशातील एकमेव प्रामाणिक पक्ष आहोत आणि आमचे आमदार नेहमीच गोमंतकीयांच्या हितासाठी काम करतील.”

आप वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी वेळ्ळीतील लोकांनी इतरांना न विनडता 'आप'ला निवडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “काँग्रेसचे काही नेते आणि भाजप यांच्यातील सेटिंग निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये उघड झाली होती. काँग्रेसला मतदान करणे म्हणजे भाजपला अप्रत्यक्षपणे मत देण्यासारखे असल्याचे आपने भविष्यवाणी केली होती. आज आपचे भाकित सत्यात उतरले आहे.

'आप'चे आमदार कोणत्याही पक्षात सामील होणार नाहीत आणि सर्वसामान्यांच्या भल्यासाठी काम करतील, हे आमचे वचन आहे. यावेळी आपचे अध्यक्ष अॅड. अमित पालेकर, आप वेळ्ळीचे आमदार इंजिनियर क्रुझ सिल्वा, आप उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि आप नेते जर्सन गोम्स उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com