Goa Accident: कारची क्रेनला धडक, युवकाचा जागीच मृत्यू

मोपा लिंक रोडच्या मंदावलेल्या कामाचा परिणाम
Car Accident
Car AccidentDainik Gomantak

पेडणे: राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील सुकेकुळण-धारगळ येथे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कारने मार्गावरील क्रेनला जोरदार धडक दिली. या अपघातात रिकी रवी बिनावाट (28, रा. हडपसर-पुणे) येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील निधी राहुल गोडसे (27, पुणे) व सुनील प्रकाश खरात (37, रा.पुणे) हे जखमी झाले.

(goa accident case car hit the crane, the youth died on the spot)

Car Accident
Goa Tourism: गोव्यात हूल्लडबाजांना बसणार चाप; पोलिस अधीक्षकांनी दिले कारवाईचे आदेश

काल सकाळच्या सुमारास गोव्यात सहलीसाठी आलेले तिघेजण स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एमएच १२ एचझेड १४१९) पुण्याला जात होते. यावेळी सुकेकुळण-धारगळ मार्गावर मोपा लिंक रोडचे काम करण्यासाठीचा क्रेन महामार्गावर निष्काळजीपणे उभा होता.

वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कारची क्रेनला जोरात धडक बसली. त्यात चालक रिकीचा जागीच ठार झाला. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी अपघातास जबाबदार तसेच घटनेनंतर क्रेन हलविल्यासंबधी गुन्हा नोंदवून क्रेनचालक सुरज सहानी याला अटक केली. तर जखमी राहुल आणि सुनील यांच्यावर गोमेकॉत उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला.

Car Accident
Goa Petrol Diesel: कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यास गोव्यात होणार पेट्रोल-डिझेल स्वस्त

अपघाती मृत्युंचे सत्र कायम

राष्‍ट्रीय महामार्ग ६६चे रुंदीकरण पत्रादेवी ते धारगळ दरम्‍यान सुरू आहे. आतापर्यंत या रस्त्यावर १८हून अधिक लोकांचे मृत्‍यू झाले आहेत. त्यात तोर्से सरकारी हायस्कूलकडे आठ जण मृत्युमुखी पडले आहेत. या भागातील रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत अजूनही ज्या पद्धतीने रस्त्याचे रुंदीकरण आणि अर्धवट स्थितीत रस्ता आहे, त्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

पादचारी ठार

कांपाल मिरामार रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अपघातानंतर पसार झालेला कारचालक सावियो जॉन नोरोन्हा (रा.बामणवाडा-शिवोली) याला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने शोधून अटक केली. मृताची ओळख अद्याप पटली नसून तो भिकारी असल्याचा संशय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com